कंधार
सध्याच्या काळात जो-तो लिंबोटी धरणाचे पाणी पळवापळवी करण्यात व्यस्त आहेत. कंधारचा राजकिय सुड उगविण्यासाठी तत्कालीन सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून वरवंटचे मानार धरण करुन कंधार व लोहा तालुक्यातील सुपीक जमीन पाण्याखाली गेली,हे धरण होतांना साडेतीन हजाराच्यावर वीर सत्याग्रही लोकांनी मानार धरण वरवंट प्रकल्पास विरोध केला.
पण त्या आधी तत्कालीन आमदार महोदयांनी तुकाईच्या माळावर लिंबोटी धरणाची संकल्पना डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी मांडली.त्यास विरोध करणारे सत्ताधारी पक्षांनी वरवंटचे लोअर मानार प्रकल्प करुन सुड घेतला. लिंबोटी धरणाचे शिल्पकार होण्यास लाईन लागली.आधी अहमदपूर,उदगीर,पालम आणि आता लातूर पण धरणाच्या पाण्याची पळवा पळवी होतांना सर्व लोकप्रतिनिधीं मुग गिळून गप्प का?
कुणीही लिंबोटीचे पाणी पळवावे,
धरण उषाला पण भविष्यकाळी,
कोरड घशाला पडणार आहे!
वेळीच प्रतिबंध करा नाही तर,
भविष्य पश्चातापात जाणार आहे?
लिंबोटी धरणातील पाण्याच्या पळवापळवीवर आजचे
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचे
कंधारी आग्याबोंड वाचा!
