कायापालट उपक्रमास धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून प्रतिसाद ; २१ जणांनी घेतला लाभ

नांदेड ; प्रतिनिधी

पाऊस पडत असताना देखील नियोजित कायापालट या उपक्रमाच्या दुसऱ्या आठवड्यात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजपा महानगर नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 21 बेघरांची मोफत दाढी कटिंग करून नवीन कपडे जेवण व शंभर रुपयाची बक्षिसी देण्यात आली.

आर्थिक अडचणीमुळे किंवा वेडसरपणामुळे डोक्याचे जंगल बनलेल्या रस्त्यावरील निराधारांना विश्वासात घेऊन त्यांची कटिंग दाढी करण्याचा ” कायापालट ” हा उपक्रम पंधरा दिवसापूर्वी दिलीप ठाकूर यांनी सुरू केला. सोमवारी सकाळी सहा वाजता सर्वांची दाढी कटिंग करण्याचा निरोप सर्व बेघरांना आदल्या दिवशीच देण्यात आला होता.

मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडत असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण संयोजक दिलीप ठाकूर यांनी कार्यक्रम घ्यायचा असा निर्धार केला. नागनाथ महादापुरे,अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा यांनी भर पावसात सर्व रस्ते फिरून योग्य व्यक्तीची निवड केली. बजरंग वाघमारे यांनी 21 बेघरांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.

बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने सर्वांच्या आंघोळीची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांना नवीन अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट ,शर्ट परिधान करण्यासाठी देण्यात आले. पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे झालेला कायापालट पाहून बेघरांना स्वतःचेच नवल वाटले.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *