ओबीसी आरक्षण रद्द च्या निषेधार्थ माळाकोळी येथे “रास्ता रोको ” आंदोलन ; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती

माळाकोळी ; एकनाथ तिडके

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केले असल्यामुळे या निर्णयाविरोधात माळाकोळी येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून सदर निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली.


सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला या संदर्भाने माळाकोळी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष माउली गीते यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी “रास्ता रोको ” आंदोलन करण्यात आले, यावेळी ओबीसी आरक्षण बचाव समिती स्थापन करण्यात आली व सदर समिती आगामी काळात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष माउली गीते , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामचंद्र येईलवाड , भाजपाचे कृष्णा केंद्रे , ना धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय संतोष केंद्रे , तुळशीराम बैनवाड, तुकाराम चाते, माधव केंद्रे, रामेश्वर महाराज केंद्रे, गोकुळ केंद्रे, नामदेव केंद्रे, भैय्यासाहेब जोंधले, बाबूराव केंद्रे,नागनाथ पुरी, शंकर जायभाये, तिरुपती पंदल वाढ, रवी चाटे, बबन सोनटक्के.. व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

माउली गीते

“अलीकडच्या काळात सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे राजकीय आरक्षण रद्द असो अथवा शैक्षणिक समांतर आरक्षणाचा विषय असो यामध्ये ओबीसी समाजावर अन्याय कारक भूमिका घेतली जात आहे या बाबतीत सरकारने योग्य पावले उचलावीत अन्यथा व विशेष समाज तीव्र आंदोलन उभारणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *