लोकशाही प्रशासन व्यवस्थेत सत्ताधार्यांच्या प्रत्येक कार्याला विरोधी पक्षांनी विरोधच केला पाहिजे का ? -भाई गुरूनाथराव कुरूडे (माजी आमदार)

सध्याचे युग हे लोकशाही तत्वाचे युग आहे.व जगात बहुतेक देशात कमीअधिक प्रमाणात लोकशाही व्यवस्थेचीच सत्ता आहे. हुकुमशाही किंवा राजेशाही च्या सत्ता बोटावर मोजण्याइतक्याच असणार बरोबरच आहे. पूर्वीची राजेशाही म्हणजे हुकुमशाहीच होती. “राजा बोले दलहाले”.त्यामुळे गरीब,दारीद्री ,दीन लोकांची दादच कुणी घेत नव्हते.

.
प्रशासन व्यवस्था एकशाहीची असल्याने सामान्य अशा बहुजन समाजाचे काहीच चालत नसे, त्यामुळे एकशाहीची जागा आता “लोकशाहीने घेतली “. लोकांनी निवडलेले चालवलेले लोकांचेच सरकार अशी लोकशाहीची व्याख्या आहे असे जरी असले तरी आम जनता काही राजकीय निर्णय घेत नाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे काम करतात ,त्यामुळे एका व्यक्तीच्या राजाच्या हुकूमशाहीला एकदम आळा बसला. यालाच स्वराज्य असे म्हटले जाते .असे स्वतःच्या लोकांनी चालवलेले स्वराज्य प्रथम भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले. ते जरी राज्यभिषेक करून राज्यावर बसले असले तरी ,लोकांच्या इच्छा प्रमाणे नेमलेले अधिराज्य छत्रपतींनी राज्यांसाठी नेमले होते. आज त्याच लोकशाहीचे स्वरूप पूर्णपणे बदलून निवडून दिलेले प्रति निधी आमदार ,खासदार, व बहुमताने त्यांचे मंत्रिमंडळ हे राज्य चालवते ,म्हणून लोकांचे राज्य आपण म्हणतो .आता हे लोकप्रतिनिधी नेहमीच सत्य अथवा लोकशाहीत शामिल ठेवून राज्य चालवत आतच असे होणार नाही. म्हणून अशा शासन व्यवस्थेत त्यांच्या चुका दाखवणारे व खरा मार्ग दाखवणारा, विरोधी पक्ष असतो .त्यांनी चुका केलेल्या अथवा अनावधानाने जन विरोधी काही निर्णय व अंमलबजावणी होत असेल. तर तेथे विरोधी पक्षांनी त्याच्यावर चूक दाखवून व ती चूक असल्याचे सिद्ध करूनच विरोध केला पाहिजे .असा नियमच आहे .परंतु सध्या असे होत का?
सध्या ची शासन व्यवस्था व विरोधी पक्ष वरील लोकशाही तत्त्वाप्रमाणे विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे त्याशिवाय खरी लोकशाही रुजू शकत नाही .ही एक तात्विक दृष्टीने शंभर टक्के खरे आहे. परंतु सत्तेवर असलेले सरकार काही चांगले निर्णय घेत असले व त्यामुळे जनतेचा कल्याण होत असेल तरी ,त्या सरकारचा ही विरोध विरोधी पक्षांनी करावाच असे कुठेच लोकशाही तत्वात नाही .परंतु सध्याच्या महाराष्ट्राच्या सरकार बदल चालू आहे. कोणत्या पक्षाचे सरकार आहे याचा विचार करून नुसता विरोधच करावा !असे होता कामा नये,परंतु सध्या नेमके हेच होत आहे .महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाची आघाडी सरकार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा तीन पक्षाचे सरकार आहे. त्याच्या आधी भाजपा व शिवसेना युतीचे सरकार होते.

भाजपचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे होते .त्यांचा पक्ष यावेळी मोठ्या संख्येने निवडून आल्याने कोणा त्यांचेच सरकार येणार व ना.नरेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असा जाहीर प्रचार झाला. मीच मुख्यमंत्री होणार असे सारखे फडणवीस साहेब बोलत होते. परंतु शिवसेना व त्यांची युती असली तरी पूर्वी त्यांना वागणूक चांगली मिळाली नाही .गुलामाप्रमाणे शिवसेना वागणूक दिली गेली. असे नुकतेच शिवसेनेचे खासदार श्री राऊत साहेब यांनी जाहीर पणे सांगितले. त्यामुळे सरकार बदलले व मुख्यमंत्री शिवसेनेचे आमदार जास्त असल्याने त्यांचा व काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर मंत्री नियमानुसार वाटून सरकार स्थापन केले त्याला दीड वर्ष होत आले परंतु भाजपचे नेते मात्र सतत आमचेच सरकार येणार मीच मुख्यमंत्री होणार कारण हे तीन पक्षाचे सरकार टिकणार नाही म्हणून ते असे बदनाम होईल असे बदनाम होईल यासाठी भाजपने जबाबदार नेते सुद्धा जंग जंग पछाडत आहेत कोरोनाच्या व्यवस्थित काम राज्य सरकारांना केंद्राच्या आदेश व सूचना प्रमाणे वागावे लागते याची माहिती असताना सुद्धा सतत महाराष्ट्राची मंत्रीमंडळ चुकीचे आहे असे सांगत भाजप नेते पराकोटीला जात आहेत लोक डाऊन करणे अथवा ओपन करणे केंद्राच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार घेतलेले आहे प्रत्येक निर्णयाला कडाडून विरोध करण्याचा सपाटा लावला आहे पंढरपूरची वारी नामदार पवार साहेब मुख्यमंत्री यांनी पालखी व वारकऱ्यांचा सन्मान ठेवीत पूर्वीसारखी लाखो लोकांची गर्दी शाही नको म्हणून व्यवस्था केली की लगेच भाजपने ते तातडीने विरोधाला तयारच सरकारच वारकर्‍यांचा अपमान करीत आहेत अशी बदनामी करीत आहेत कुंभमेळा प्रमाणे प्रकार होऊ नये म्हणून सांगितले तरी त्यांचा विरोध सुरूच आहे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालय यांनी विरोध विरोध इन निकाल देऊन ही बाब केंद्र सरकार व राष्ट्रपती ची आहे असे स्पष्ट सांगितले तरी महाराष्ट्र सरकारच दोषी आहे याचे विरुद्ध लढा उभारा असे प्रोत्साहन देतात विरोधासाठी विरोध करणे म्हणजे लोकशाही नव्हे त्याची चूक झाली त्यांना दोन ऐवजी तीन याच सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही असे खोटे बोल पण रेटून बोल प्रयत्न चालू आहे विरोधासाठी विरोध हे कोणत्याच लोकशाहीत बसत नाही साधी बाब ही त्यांना समजू नये याचं आश्चर्य वाटते त्यापेक्षा मला तर वाटते की केवळ सरकारचा विरोधच करण्याचे काम विरोधी पक्षाचे आहे असा गैरसमज त्यांचा झालेला आहे .नव्हे हटाने वेड घेऊन पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे .परंतु सुज्ञ जनता हे सर्व ओळखून आहेत .म्हणून, विरोधकांनी विचारपूर्वक विरोध करावा , व खरी लोकशाही जिवंत ठेवावी असे आम्हाला वाटते..!

गुरूनाथराव कुरूडे
कंधार ९५२३१३६२५७
( माजी आमदार, स्वातंत्र्यसेनानी )माजी सभापती कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *