कंधार ; प्रतिनिधी
नारनाळी ता.कंधार येथिल एका महीलेस अश्लिल शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कंधार पोलीसात एका विरुद्ध दि.१७ जुन रोजी भादवी कलम 294 ,323,506 आन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नारळी येथे तक्रारदार महिला ललिताबाई माधव सोमवारे ह्या आपल्या नवऱ्याला बोलावण्यासाठी घरून बाहेर गेले असता गावातील खाकू धुडेकर यांच्या घरासमोर जाऊन आवाज देऊन बोलावून घेतले. तेव्हा फिर्यादी महिला ललिताबाई यांना आरोपी खाकू नागोराव धडेकर यांनी तू तुझ्या पतीला माझ्या सोबत असल्याने का बोलावून घेऊन जातेस म्हणून शिवीगाळ केली. माझ्या घरी कशाला आलीस म्हणून अश्लील शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली आणि पुन्हा माझ्या घरा समोर आलीस तर तंगडी तोडण्याची धमकी दिली. सदरील घटना ही दिनांक 17 जून रोजी गुरुवारी घडली आहे.दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्टेशनमध्ये खाकू धडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आसून पुढील तपास नामदेव राठोड करत आहेत.