कंधार ; प्रतिनिधी
मौजे अंबुलगा येथे संभाजी वडजे यांच्या शेतातील पेरणी आज होत आहे.या प्रकारच्या पेरणीमुळे बियाण्यात १५ ते २० टक्के बचत होते.पाऊस जास्त झाल्यास सरीतून पाणी निघून जाते.पाऊसाचे पाणी सरीत मुरते ओलावा टिकून राहतो पावसाचे खंडाचा पिकावर विपरीत परिणाम होत नाही.पिकाच्या उत्पादनात १५ ते २० % वाढ होते. त्यामुळे रूंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करा असे आवाहन कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले .