१९९७ पासून सोसायटी फेडरेशन ची स्थापना न करणाऱ्या विकासकावर ४२० अंनव्ये गुन्हा दाखल व्हावा.:- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) आकृती हब टाऊन विकासक एफएसआय मधील सदनिका विकून नफा कमवत असून प्रकल्पातील इमारतीचे सोसायेटी फेडरेशन न बनवल्यामुळे एमआयडीसी चे प्रचंड नुकसान होत असल्याची माहिती डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी यांनी सांगितले की, आकृती हब टाऊन विकासक विमल शहा झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचे सर्व नियम मोडत असून यावर कुणाचाही अंकुश राहिला नाही.

योजनेचे आशय पत्र क्र.१३१३ दि २८/०४/१९९७ मुद्दा क्र. ४ मध्ये नमुद प्रमाणे सोसायटी फेडरेशन स्थापना करण्याची पूर्तता असून एमआयडीसी चे दुसरे पत्र क्र ए-८७२५० दि ७/३/३०२९ अनव्ये सूचित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र: मुजोर विकासक विमल शहा अश्या कोणत्याही नियमाला न जुमानता प्रकल्पात चोरी चे सत्र चालवले आहे.

सोसायटी फेडरेशन स्थापना केली नसल्याने पुनर्वसन इमारतीच्या सोसायट्या सोबत एमआयडीसी ला ३० वर्षकरिता लीज करारणामा करण्यास अतिविलंब होत आहे.

किंतु एफएसआय च्या विक्री घटकातील बांधण्यात आलेल्या इमारतीचे लीज करारनामे करून भाडे/विक्री तत्वावर वाटप करून स्वतः विकासक महाचोर विमल शहा महादलाल मुरजी पटेल याला हाताशी धरून नफा कमवत आहे.

एकंदरीत महाचोर विकासक विमल शाह व महादलाल मुरजी पटेल यांनी प्रकल्पात चोरी फसवणूक याशिवाय काहीच कामे केली नसून ४२० प्रमाणे या दोघांवर व यांना साथ देणाऱ्या दलाल केवल वालॅभिया गुन्हा नोंदविण्याची मागणी प्रसार माध्यमातून डॉ माकणीकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *