मुंबई दि (प्रतिनिधी) एमआयडीसी महामंडळाने चोर आकृती हब टाऊन विकासकाला काही दुरुस्त्या व सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत,: मात्र: विकासक कोणत्याच आदेशाचे पालन करत नसल्याचा जाहीर आरोप डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.
१.बृहन्मुंबई महापालिके कडून कायमस्वरूपी नळजोडणी करवून घेणे.
२.पात्र/अपात्र साठी निर्णय घेण्यासाठी कागदपत्र व अहवाल जमा करणे.
३.पात्र झोपडी धारकांना थकीत भाडे धनादेश अदा करणे.
४. आजही गोडावून असलेल्या ठिकानाचे सुसज्ज विकासक कार्यालय निर्मित करणे.
५.करारानुसार झोपड्यांचे निष्कासन करणे.
६.परस्पर वाटप केलेल्या झोपडी धारकांचे कागदपत्र जमा करणे.
७.अपात्र घुसखोरांना बाहेर काढणे.
८.हरेक पॉकेट/इमारती निहाय वाटप केलेल्या सुविधा गाळ्यांचा माहिती तक्ता जमा करणे.
९. दि. २२ अगस्ट २०१९ रोजी सोडत झालेल्या पात्र झोपडीधारकांना सोडती नुसार कायमस्वरूपी सदनिका द्यावी.
दि. ११/११/२० रोजी एमआयडीसी प्रशासनाने जा क्र. आयएफएमएस/काअ/ ठाणे-०१/सी-९६६७९/२०२० पत्रांनव्ये कार्यालयीन आदेश दिले आहेत. मात्र: आज पर्यंत विकासकाने आदेशाचे पालन केले नाही.
याचा मास्टर माईड महादलाल मूर्जी पटेल व सहकारी केवल वालंभिया असल्याचे जाणते समोर उघडकीस आले असले तरी याचा तारणहार व गरिबांच्या भावनांचा मारेकरी याला असे गैरकृत्य करण्यास मदत करणारा पडद्यामागील हस्तक कोण आहे याचा शोध लावणे महत्वाचे आहे. आणि तेही मी शोधणार असल्याचे डॉ माकणीकर यांनी सांगितले.
विकासक विमल शहाणे केलेल्या चुका सुधारण्यास एमआयडीसी प्रशासनाने वेळ देऊनही, त्याची मुदत संपूनही आज बरेच महिने गेले मात्र: आजही स्तिथी जैसे ठे आहे, त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होवून विकासक विमल शहा, मुरजी पटेल व यांचा साथीदार केवल वालंभिया व प्रशासनाचे तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी २ जुलै रोजीच्या पावसाळी अधिवेषणावर मोर्चा आंदोलन करत असून आता जनतेने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.राजन माकणीकर यांनी केले आहे.