कंधार ; प्रतिनिधी
शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शनिवार दि.१९ जुन रोजी शिवसैनिकाच्या वतीने सकाळी कंधार येथिल शिवे वरच्या गणपतीचा जलाभिषेक व आरती करण्यात आली.
यावेळी परमेश्वर चौधरी,योगेश झंम्पलवाड,गिते मामा,दिलीप कागणे यांची प्रभातकाळी उपस्थिती होती.आज ५५ वर्ष झाली शिवसेनेला स्थापन होऊन ५५ वर्षात बाळासाहेबांचा शिवसैनिक बदलला नाही तो तसाच आहे जो ५५ वर्षापुर्वी होता.मी जन्माने शिवसैनिक आहे मरेपर्यंत शिवसैनिक राहणार..ना तुटणार ना फुटणार सदैव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेशी एकनिष्ठ राहणार.मरण जरी आले तरी हरकत नाही पण शिवसेनेच्या अंगावर येणार्यांना शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अशी प्रतिक्रिया शिवसैनिक तथा माजी नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी दिली.व ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.