कंधार ; प्रतिनिधी
पेट्रोल डिझेल चे दर गगणाला गेले असून त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांचे बेहाल होत असून शासनाने तात्काळ वाढलेले पेट्रोल व डिझेलचे वाढते दर २५ %दरांने कमी करावे अशी मागणी कंधार एआय एमआयएम पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे आज दि.१९ जुन रोजी तहसिलदार कंधार यांच्या मार्फत केंद्र शासनाला करण्यात आली आहे.
पेट्रोल डिझेल हे आजच्या परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तू झाली आहे.साधारणपणे केंद्रशासन 33 रुपये प्रति लिटर पेट्रोल तर 32 रुपये प्रति लिटर डिझेलचे दर आकारात आहे. तसेच राज्य शासन VAT व्हॅटच्या नावाखाली 25 टक्के प्रति लिटर पेट्रोल व 22 प्रति लिटर डिझेल वर आकारीत आहे. ही वस्तुस्थिती 15 मार्च 2021 रोजीच्या संगणक प्रणालीची आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाने आपले टॅक्सेस कमी करून, पेट्रोल-डिझेल याचे प्रतिलिटर टॅक्स कमी करून सध्या आकारण्यात आलेल्या किमतीमध्ये 25 टक्के घट/कपात केली पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे.तसेच रसोई गॅस व गोडतेल/खाद्य पदार्थ तेलच्या किमती कमी करून जनतेस दिलासा देण्यात यावा अशी मागणी AIMIM पक्षाच्या कंधार शाखेच्या वतीने दि.१९ जुन रोजी करण्यात आली आहे.
तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी सदरील मागणीचे निवेदन केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय व राज्य विक्रीकर खात्याला पाठवून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
या निवेदनावर कंधार एम आय एम ता अध्यक्ष मोहमंद हमेदोद्दीन भाई ,शेख आरेश भाई,मिया भाई मकसूद,पठाण मगदूम गौसमिया,शेख अफरोज भाई,शेख फेरोज हारूण, शेख मोईन,शेख सद्दाम यांच्या स्वाक्षरी आहेत.