रूंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड क्षेत्रात होतंय लक्षणीय वाढ
कंधार ; प्रतिनिधी
मौजे दाताळा तालुका कंधार येथे श्री रोकडोबा फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या औजारे बँकेमार्फत खरेदी केलेल्या औजारांपैकी ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्राची जुळवणी करण्यात आली. या यंत्राची सुयोग्य जोडणी करण्यासाठी बारड येथील प्रगतशील शेतकरी श्री शिवाजीराव देशमुख यांचं सहकार्य मिळालं.त्यांनी सर्व यंत्राची व्यवस्थित जोडणी करून पेरणीचे प्रात्यक्षिक घेतले.
ही जोडणी करून पेरणी साठी यंत्र सज्ज केले आहे. रुंद वरंबा-सरी या पद्धतीने लागवड करण्यासाठी मौजे दाताळासह परिसरातील गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असून या ट्रॅक्टरद्वारे जवळजवळ १०० हे.क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित आहे. तालुक्यात गतवर्षी बीबीएफ लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले असून झालेला फायदा पाहता या वर्षी अनेक शेतकऱ्यांचा कल या पद्धतीने लागवड करण्याकडे झाला अआहे.तालुक्यात क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधवांच्या सहकार्याने एक हजार हेक्टर क्षेत्रावर अशी लागवड करण्याचे नियोजन आहे.याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड, रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी, कंधार रमेश देशमुख,प्रभारी मंडळ कृषी अधिकारी रमाकांत भुरे त्याचबरोबर प्रभारी कृषी पर्यवेक्षक विजय कदम ,कृषी सहाय्यक बालाजी डफडे, परमेश्वर मोरे ,सतीश गोगदरे ,गोविंद तोटावाड ,मधुकर राठोड सौ.उज्वला देशमुख यांची उपस्थिती होती. गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संभाजी फुलवळे यांच्या औजारे बँक ठिकाणी शेतकऱ्यांना विविध कृषी विभागाच्या योजनांची माहिती व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये उगवण क्षमता चाचणी ,सोयाबीन बियाण्याची बीजप्रक्रिया ,रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड ,रासायनिक खतांचा काटेकोर वापर व दहा टक्के बचत याबाबत माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी तालुक्यात यापूर्वी रुंद वरंबा सरी या पद्धतीने लागवड होत नव्हती परंतु कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आता या पद्धतीने लागवड करण्यास शेतकरी पुढे येत आहेत .या पद्धतीने लागवड केल्यामुळे बियाण्यामध्ये १५ ते २० टक्के बचत होते उत्पादनातही १५ ते २० टक्के वाढ होते. त्याचबरोबर पाऊस जास्त झाला तर जास्तीचं पाणी वाहून निघून जाते आणि कमी पाऊस पडल्यास या सरीमध्ये पाणी मुरून ओलावा टिकून राहतो. सोयाबीन या पिकांसोबतच पुढच्या हंगामातील हरभरा या पिकांना त्याचा लाभ होतो त्यामुळे अशा पद्धतीने पीक पेरणी करण्यावर शेतकर्यांनी भर द्यावा असे सांगितले. कृषी विभागाच्या माध्यमातून औजारे बँकेची स्थापना करून विविध औजारे खरेदी केल्यामुळे शेतीतील कामे सोपी झाली असून अशा औजारे बँकेसाठी अनेक शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत लागवड केलेल्या तुतीची पाहणी केली.खरीप हंगामाच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन गावात शिवार फेरी केली.
सरपंच भाग्यश्री संजय फुलवळे ,संजय शिंदे, संभाजी शेषराव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.