नांदेड ; प्रतिनिधी
जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या नांदेड दक्षिण च्या वतीने साईबाबा मंदिर धनगरवाडी येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले, जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सरचिटणीस गंगाधर जोशी, नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष सुनील मोरे, प्रशिक्षक शिवाजी शिंदे हळदेकर, विकास केंद्रे, डॉ.संभाजी पवार, डॉ.अवदुत पवार आदींची उपस्थिती होती.
छायाचित्र-सचिन डोंगळीकर