कंधार ;प्रतिनिधी
हरित कंधार परिवाराच्या वतीने दिनांक १जुलै कृषिदिनाचे अवचित्य साधून पाचहजार फळझाड वृक्षाची लागवड उपक्रम राबवण्यात येत असून त्यात कंधार तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी दोन फळझाडे दिली जाणार असल्याची माहीती हरित कंधार उपक्रमाचे संयोजक शिवा मामडे यांनी आज शनिवार दि.१९ जुन रोजी पत्रकार परीषदेत कंधार येथे दिली असून आज दि.२१ जुन रोजी महाराणा प्रताप चौक येथे नोंदणी अभियान सुरु झाले .शिवा मामडे ,शहाजी नळगे ,गंगाप्रसाद यन्नावार,पांगरेकर गुरुजी,गरुडकर सर ,ठाकुर आदी नोंदणी साठी अभियान सुरु केले आहे.
ती झाडे शेतात, घरासमोर अथवा उपलब्ध मोकळ्या जागेत लावून त्याचे संगोपन करायचे असल्याने कंधार शहर व तालुक्यातील वृक्षप्रेमी नागरीक व तरुणांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन हरित कंधार परिवाराचे संयोजक शिवा मांमडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
गतवर्षी २५०० फळझाडे वाटप करण्यात आली होते,या वर्षी हे लक्ष पाच हजाराचे ठेवण्यात आले आहे.कोरोनाचा नियम पाळत ,वितरणाच्या वेळी गर्दी होऊ नये या साठी दि २१ जून ते २६ जून दरम्यात कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक येथे नोंदणी केंद्र उमभारण्यात येईल कंधार तालुक्यातील नागरिकांनी तेथे नोंद करून घेऊन त्यांना टोकन देण्यात येणार आहे त्या टोकन क्रमांक नुसार फळझाडे दि १जुलै ते ३जुलै हे तीन दिवस १० ते ४ या वेळेत वितरित करण्यात येणार आहेत.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी संयोजक शिवा मामडे ,शहाजी नळगे,प्रदीप गरुडकर,ॲड .गंगाप्रसाद यन्नावार ,अजय मोरे,योगेंद्रसिंग ठाकूर ,राजरत्न सुर्यवंशी ,रमाकांत फुके ,संजय ढगे,दिपक गरुडकर ,सागर डोंगरजकर ,हौसाजी कागणे ,विश्वनाथ पांगरेकर ,नामदेव सुवर्णकार ,प्रविण बनसोडे,जितेंद्र गरूडकर,आदी सदस्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.