पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अस्थीविसर्जित केल्याने निर्माण झाला मन्याड खोर्यातील बहाद्दरपुरा येथे
शांतीघाट
कंधार:-
मन्याड खोर्याची शान असलेल्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार या नगरीत शांतीघाट निर्माण कसा झाला. हे खुप जणांना माहित असेलच असे नाही.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींचे देहावसन झाल्यानंतर त्यांची हयात असतांना अंतीम इच्छेनुसार माझ्या भारतातील सर्व प्रवाहित नद्यांच्या प्रवाहात माझी रक्षा विसर्जित करावी अशी होती.त्यांच्या अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी कंधार येथील स्वातंत्र्य सैनिक अनंतरावजी मामडे साहेब यांनी थेट दिल्ली राजधानी गाठली.
त्यावेळी पंतप्रधान पदाचे दावेदार लालबहाद्दूर शास्त्रीजींना आपली इच्छा बोलून दाखवली. मला पंडीतजींची रक्षा कंधार येथे घेवून जायची आहे.मला ती नेता येईल काय?पण त्यांना नकारच मिळाला.
आमचे अनंतरावजी मामडे साहेब यांची जिद्द सर्वज्ञात होती.त्यांनी दिल्लीत मन्याडी बाणा दाखवून ही रक्षा मी नेणारच! मला रक्षा मिळाली नाही तर मी प्राणत्याग सत्याग्रह करणाच! ही दृढनिश्चयता पाहून प्रशासनास दखल घ्यावी लागली. मग मामडे साहेब यांनी नेहरुजींची रक्षा सन्मानाने कंधारला आणुन कंधार येथील साधु महाराज यांचे मठात ठेवली.
नंतर चर्चा रंगू लागली ही रक्षा मठातल्या विहिरीत टाकावी पण पाणी प्रवाहित नाही,कांहीच्या जगतूंग सागर तलावात टाकावी,तेथे ही प्रवाह नाही.मग नांदेड जि.प.सन्माननिय अध्यक्ष श्यामरावजी कदम साहेब पुढाकारने व आमदार भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या कल्पकतेमुळे व भाई गुरुनाथरावजी कुरूडे साहेब यांच्या सहकार्याने ही रक्षा बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीच्या प्रवाहित पाण्यात विसर्जित करण्याचा निर्णय झाला.त्या नंतर येथे घाट असल्याने या घाटाला शांतीघाट असे नाव देण्यात आले.
त्यानंतर शांतीघाट येथील प्रवाहित बॅकवाॅटर मानार जलाशय याला राजीव सागर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून नामकरण करण्यात आले. त्यावेळी बहाद्दरपुरा नगरीचे सरपंच भाई मा.बजरंगलाल चौधरी तर उप सरपंच मा. भाई संभाजीराव पा.पेठकर हे होते.डाॅ.भाई साहेबांनी शांतीघाट नामकरण करुन बहाद्दरपुरा शांतीघाट विकास समितीची स्थापना करुन महाराष्ट्र विधानसभेत नामदार जाधव मंत्रीमहोदयांनी तात्काळ मान्यता दिली.
दिवंगत अनंतरावजी मामडे साहेब यांनी हयातीत अनेक विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लढविल्या आपणा सर्वांना ज्ञात आहेच.शांतीघाट येथे 1992 साली पं नेहरू बालोद्यान आमदार निधीतून करुन खाटीक समाजातील विद्यार्थी निजाम धोंगडे या चिमुकल्याच्या समर्थ हस्ते उदघाटन करुन इतिहास घडविला.इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात कंधारची सहल हा पाठ पाठ्यपुस्तके निर्मिती महामंडळाने दिला होता.31 ऑक्टोबर गुरु नानकदेव जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा व मन्मथ स्वामी महाराज जयंती दिनी कालप्रियनाथ केशवेश्वर मंदिरात ऐतिहासिक शिवलिंग पिंडींची प्रणप्रतिष्ठा मोत्या बैलाच्या दुग्धाभिषेकाने करुन इतिहास घडविला. त्याच्याच बाजूला बहाद्दरपुरा नगरीतील लोकांचे “चीरशांती धाम”आहे.हा इतिहास सर्वांना महितीसाठी.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
९८६०८०९९३१