कंधार ; प्रतिनिधी
शिक्षक नेते तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यक्रर्ते राजहंस शहापुरे यांची भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी च्या कंधार तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यापुर्वी राजहंश शाहापुरे यांनी अनेकांचे प्रश्न शिक्षक सेनेचे नेते आसताना सोडवली आहेत .त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून सदर निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा महिला मोर्चा शिक्षक प्रकोष्ट प्रदेश प्रमुख लोकप्रिय जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य व्यंकटराव गोजेगावकर साहेब,मराठवाडा विभागीय संयोजक भाजपा शिक्षक आघाडी प्रा.नितीन कुलकर्णी,शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष हावगीराव गोपछीडे यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.