मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी मा.प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन
नांदेड ; प्रतिनिधी
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउन मुळे सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना त्यात भर म्हणून सध्या महाविद्यालय व कोचिंग क्लासेस मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेताना विविध फीची रक्कम अवाच्या सवा आहे त्याचप्रमाणे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे मालक व चालक हे विद्यार्थ्याकडून अवाच्या सवा फीस म्हणून रक्कम वसूल करीत आहेत ज्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांचे पालक जे की अगोदरच आर्थिक संकटात सापडले असताना त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे व त्यांना पैसे जमा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे काही गोरगरीब विद्यार्थी व पालक तर महाविद्यालय व कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी व्याजाने पैसे काढत आहेत सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे आजच्या काळात बाजारीकरण झाले आहे हे यावरून स्पष्ट होत आहे तरी याबाबतची मा जिल्हाधिकारी साहेब यांनी गंभीर दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय मध्ये प्रवेश घेताना अनावश्यक आकारली जाणारी फी रद्द करावी तसेच प्रावेट कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्यास फिसमध्ये ४० टक्क्यांची सूट देण्यात यावी अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी मा.प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले .
सदर मागणी मान्य न झाल्यास मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने विद्यार्थ्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सदरील निवेदनात देण्यात आला आहे सदरील निवेदनावर मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हा सल्लागार तिरुपती पाटील भागानगरे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष संभाजी पाटील पवळे तालुका सचिव बाळू पाटील पांडोरणे यांच्यासह अगदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.