आत्मा व परमात्म्याशी जोडण्याचे काम योगातून होते -प्रा.डॉ.रामविलास लड्डा


मुखेड – आपल्या ऋषी-मुनींनी अनादी काळापासून योगाला महत्त्व दिले आहे. अष्टांग योग सांगितला आहे.महर्षी पतंजलींनी यासाठी खूप मोठे काम केले. योगातून मन व शरीर दोन्ही सुदृढ बनतात. मनःशांती लाभते. आध्यात्मिक समाधान लागते.श्वासाचे महत्व लक्षात येते. आपणास ईश्वराने श्वासाचे जन्मभरासाठी पॅकेज दिले आहे ते जपून वापरले पाहिजे.त्यासाठी विविध आसने करा, प्राणायाम करा. योग हा आत्म्याला परमात्म्यासी जोडण्याचे काम करतो असे प्रतिपादन योग साधना केंद्र शिवाजीनगर,परभणी येथील योगशिक्षक तथा वनस्पतीशास्त्र विभाग,संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथील प्रा.डॉ. रामविलास लड्डा यांनी ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर, ता.मुखेड जि. नांदेडच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय योग शिबिर प्रसंगी बोलताना केले. त्यांनी या तीन दिवसात योगासनांची प्रात्यक्षिके ही सादर केली. या कामी कु.भक्ती लड्डा हीचे ही मोलाचे योगदान राहिले.


या तीन दिवसीय शिबिरात योग प्रशिक्षक, योग साधना केंद्र शिवाजीनगर परभणी येथिल अशोकजी तळेकर यांनीही योगाचे महत्व विशद केले.मन,मनगट आणि मेंदुला बळकट करण्याचे काम योगातुन घडते.यात सातत्य महत्वाचे आहे.प्राणायाम,ध्यान धारणा ही महत्त्वाची आहे.भोगातून रोगाचा जन्म होतो तर योगातून निरोगी जीवन लाभते.यासाठी योगाभ्यासाला महत्त्व द्या असे सांगितले. या वेळी त्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके ही सादर केली.
या तीन दिवसीय योग शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.हरिदास राठोड यांच्या हस्ते झाले तसेच समारोप ही त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या वेळी बोलताना ते म्हणाले की आजचा काळ हा कोराना मुळे अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे कुटुंबात ताण तणाव वाढत आहेत. मन शांती कमी होते आहे. अशा काळात योगसाधना ही यावर रामबाण उपाय आहे. जगाला योगा ही भारतीयांनी दिलेली देणगी आहे. अनेक योगगुरु याचा प्रचार जगभर करत आहेत.क्रीडा विभागाने योग दिनाचे औचित्य साधून घेतलेले हे शिबिर अत्यंत यशस्वी झाले. त्याबद्दल मी संयोजन समितीचे अभिनंदन करतो. भक्तीचा योगा पाहून आमच्या मनातही योगाबद्दलची भक्ती निर्माण झाली.
या तीन दिवसीय शिबिराचे प्रास्ताविक शिबिर संयोजक तथा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.सूभाष देठे यांनी करुन शिबिर आयोजना पाठी मागची भुमिका विशद केली.
कार्यक्रमाचे तीनही दिवस अत्यंत सूत्रबद्ध सूत्रसंचलन मराठी विभागाच्या प्रा.डॉ.कविता लोहाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ.नागोराव आवडे यांनी करून दिला तर आभार प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांनी मानले. शिबिरा बद्दलच्या उत्तम प्रतिक्रिया प्रा. बाळासाहेब पवार व प्राचार्य डॉ.सुखदेव झेंडे यांनी दिल्या. या शिबिराचे तंत्र साहाय्यक म्हणून संगणक विभाग प्रमुख प्रा. संजय पाटील, प्रा. गोविंद पांडे,प्रा. डॉ.महेश पेंटेवार,प्रा. डॉ.गुरुनाथ कल्याण यांनी काम पाहिले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.एस.बाबाराव,प्रा.सूभाष कनकुटे यांनी ही सहकार्य केले.
या तीन दिवसीय शिबीराचा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच राज्यभरातून अनेक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *