कंधार ; प्रतिनिधी
प्रियदर्शनीनगर कंधार येथिल ३२ वर्षीय तरुण सुरेश माणिकराव वाघमारे यांचे आज दि.२३ जुन रोजी पहाटे ३ वाजता -हद्य विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
कंधार येथिल स्मशानभुमीत आज दि.२३ जुन रोजी दुपारी १२ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुरेश माणिकराव वाघमारे या तरुणाची पुणे येथे कोर्टात सेवकपदी निवड झाली होती व निवड पत्र प्राप्त झाले होते. तो दि.१ जुलै रोजी नौकरीस पुणे येथे रुजू होणार होता.परंतु काळाने ऐन तारुण्यात घाला घातला.२३ जुन रोजी पहाटे ३ वाजता -हद्य विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.सुरेश हा जिल्हा परीषद हॉयस्कुल चे सेवानिवृत सेवक माणिकराव वाघमारे (मामा)घोडजकर यांचा मुलगा होय.सुरेश वाघमारे यांचा निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.