कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरात एकच राष्ट्रीयकृत स्टेट बँक आँफ इंण्डिया बँक आहे व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे मात्र यादोन्ही बँकेत दलालाचा सुळसुळाट झाला असून शेतकऱ्यां कडून पैसे उखळल्या जात आहेत.आज मंगळवार दि.२२ जुन रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने बँक मँनेजरना निवेदन देवून दलालाचा बंदोबद करा अन्यथा उपोषणाचा ईशारा दिला आहे.
कंधार येथिल एस.बी आय बँक मधे व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत दलालांच्या हातुन गेलेले काम तुरंत होत आहे आणि जे गरिब लोक आहेत ते बॅंकेच्या चकरा मारुनहीकाम होत नसल्याचे चित्र सध्या कंधार शहरातील बँकेत आहे.शेवटी थकुन ते काम सोडुन देत आहेत किंवा नाविलाजस्तव दलालांच्याच पाया पडत आहेत व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या आगोदर वृत्तपत्रात बातम्या देवूनही याकडे कोणीच लक्षे दिले नाही.त्यामुळे काही लोकांनी माजी सैनिक संघटनेकडे तक्रारी केल्या होत्या.म्हणुन आज दि.२२ जुन रोजी बॅंकेत माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट देऊन लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.