माळाकोळी ; एकनाथ तिडके
कृषी कार्यालय लोहा यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती व पेरणीच्या संदर्भाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी संजीवनी मोहिमेची सुरुवात माळाकोळी येथून करण्यात आली, माळाकोळी, वागदरवाडी, घुगेवाडी ,नागदरवाडी, खेडकरवाडी या गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे.
माळाकोळी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच मोहन काका शूर, उपसरपंच निखिल मस्के ग्रामपंचायत सदस्य केशव तिडके, कृषी सहाय्यक श्री पी.एस .गुंडवाड, कृषी पर्यवेक्षक श्री बेंबडे, श्यामसिंह बयास ,बालाजी तिडके, अरुण सोनटक्के, माजी सरपंच माधव कांबळे यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यानंतर जवळील शिवारात शिवार फेरी करण्यात आली यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बी बी एफ पेरणी तंत्रज्ञान, बियाणे उगवण क्षमता तपासणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, फळबाग लागवड एक गाव एक पीक योजना, नेपेड व्हर्मी कंपोस्ट, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, महाडीबीटी पोर्टल विषयीची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.
पीक विम्याची मागणी
कायम अवर्षणग्रस्त व डोंगराळ असलेल्या माळाकोळी भागाला यावर्षीचा पिक विमा लाभातून वगळण्यात आले आहे त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे, यावेळी कशी विभागाच्या अधिकार्यांकडे माळाकोळी तील शेतकरी श्यामसिंह बयास बालाजी तिडके बाबुराव तिडके नामदेव नाथ साखरे यांनी माळाकोळी भागाला पिक विमा लागू करावा अशी मागणी केली.यावेळी कृषी सहाय्यक पीएस गुंडेवाडी यांनी शेतकऱ्यांची मागणी वरिष्ठांकडे कळवण्याचे आश्वासन दिले.