कंधार येथे वटपौर्णिमे निमित्त भाजप महिला मोर्चा तर्फे “एक वृक्ष एक जीवन”या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण व महिला भगिनींना वटवृक्षाचे रोपट्यांचे वाटप

कंधार : प्रतिनिधी


आज 24 जुन रोजी वटपौर्णिमा निमित्त भाजप महीला मोर्चा कंधार तर्फे खंडकीमाता मंदिर कंधार येथे वटव्रक्ष वाटप करुन त्याचे महत्व सांगण्यात आले.
वटवृक्ष वाटप कारेक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्य सौ प्रनिताताई देवरे चिखलीकर ,तर प्रमुख पाहुणे म्‍हणून महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सविताताई कुलकर्णी, कोषाध्यक्ष शैलाताई मोळक, नांदेडच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्राताई गोरे उपस्थित होत्या.

कंधार येथे वटपौर्णिमे निमित्त भाजप महिला मोर्चा तर्फे “एक वृक्ष एक जीवन”या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण व महिला भगिनींना वटवृक्षाचे रोपट्यांचे वाटप करण्यात आले.

महिला मोर्चा कंधारचा तालुकाध्यक्ष जयमंगल औरादकर ,वंदना डुमणे, सुनंदा वंजे ,कल्पना गीते, कल्पना कागणे,मीना मुखेडकर, शोभा ठाकूर ,स्मिता बडवणे ,सुरेखा वडवळकर यांनी यशस्वीपणे पार पाडला. यावेळी कंधार शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *