22जुन ते 28 जुन या कालावधीत कंधार तालुक्यात सामाजीक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थीची होणार पात्रता पुनःपडताळणी व सामाजीक अंकेक्षण

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यात सामाजीक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थीची संख्या जवळपास 5146 असून महाराष्ट्र शासनाचा 20/08/2019 च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी सामाजीक अर्थसहाय्य योजनेच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ /विधवा/ दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थीची पात्रता पुर्नपडताळणी करण्याची तरतुद आहे त्यास अनुसरुन दि 22 जुन ते 28 जुन पर्यत सर्व लाभार्थीची पात्रता पुर्नपडताळणी करण्याचे आदेश तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सर्व तलाठी यांना दिले आहेत.

मागील वर्षी सुद्धा जुन मध्येच अशी पुर्नपडताळणी व सामाजीक अंकेक्षण तहसील कार्यालयाकडून तलाठी मार्फत करण्यात आले होते व पडताळणी नंतर जवळपास 154 लाभार्थी अनुदान यादीतून वगळण्यात आलेले होते.

जाहीर प्रगटनानंतर अदयापही खाते सादर न करणा-या 103 लाभार्थींना तहसीलची अंतिम नोटीस

कंधार तालुक्यात सामाजीक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थीची संख्या जवळपास 5146 असून जवळपास 215 लाभार्थीनी त्यांचे बॅक/पोस्टाचे खाते नंबर सादर न केल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयाकडून अनुदान वितरीत करता आले नाही. त्यांना अर्थसहाय्य मिळावे ते वंचीत राहू नये म्हणून तहसील कार्यालयाकडून खाते संकलनासाठी व्हॉट्स अप् मोहीम, तलाठी कोतवालामार्फत खाते संकलनासाठी प्रयत्न केले यास वृत्तपत्रानेही प्रसिध्दी दिलेली होती. 14 मे 2021 रोजी जाहीर प्रगटनाद्वारे 31 मे 2021 ” पर्यत खाते संकलनास मुदत दिलेली होती त्यास अनुसरुन जवळपास 112 लाभार्थी बाबत – 57 खाते प्राप्त , 1 दिव्यांग महीला लाभार्थीनी नोकरीस लागल्याने स्वत:हून लाभ बंद करण्याचे कळवीले असून व 54 लाभार्थी मयत झालयाची माहीती प्राप्त झाली आहे. अजुन 103 लाभार्थीबाबत खाते संकलन प्रलंबीत आहे. कोव्हीड 19 मुळे परत एकदा संधी म्हणून या 103 लाभार्थीना अंतिम नोटीस तहसील कार्यालयाकडून पाठविण्यात आलेलया आहेत व नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसाच्या आत खाते नंबर सादर करण्याची संधी यानोटीसेद्वारे देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त पात्र असलेल्या निराधारांना अर्थसहाय्याद्वारे आधार देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *