कंधार ; प्रतिनिधी
उस्मान नगर ता.कंधार येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये असलेल्या पोच्यामाई च्या मंदिरास लोखंडी चैन गेट ग्रामपंचायतच्या विरोधी पक्षनेत्याच्या (सदस्याच्या) स्वखर्चातून.भेट देवून नांदेड जिल्ह्याचे खासदार मा श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक असल्याचे ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक,सामाजिक कार्यकर्ता जनतेचा सेवक उस्माननगर ग्रामपंचायत सदस्य विरोधी पक्ष नेता, शिवशंकर काळे यांनी सिद्ध केल आहे.
निवडणुकीच्या प्रचारात अनेक नेते वचणे देतात सत्तेत आल्यानंतर तोडकी मोडकी कारणे देऊन कामे टाळताना अनेकदा पाहण्यात आले परंतु यास शिवशंकर काळे हे अपवाद ठरले. निवडणुक प्रचारात भक्त मंडळीने पोच्यामाई च्या मंदिरास गेट नाही आणि कृपया आपण निवडून अल्यानंतर तो बसवून द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्या मागणीस शिवशंकर काळे यांनी मी सत्तेत असो किंवा नसो मंदिरास चैन गेट नक्कीच देईन हा शब्द दिला होता आणि खरोखर आज शिवशंकर काळे सत्तेत नसतानाही स्वतः च्या खिशातून मंदिरास चैन गेट दिला या यांच्या दानत्वाचे गावकरी, भक्तमंडळीने कौतुक केले. या प्रसंगी देवकर, कमलबाई लिगुवड, गंगामाय मोरे, रावसाहेब भिसे, हिरामण मोरे, बाबू वड, गोविंद शामदीरे, उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य, रुद्र वारकड, बालाजी पाटील घोरबांड, नारायण पाटील घोरबांड, शेषराव पाटील,काळंम, मोहम्मद शरीफ, शेख दस्तगीर, हे उपस्थित होते. आणि खरोखच दिलेल्या शब्दाला जगणारा नेता म्हणून शिवशंकर काळे चे नाव अभिमाने घेतले जाते…