कंधार ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी च्या कंधार तालुकाअध्यक्ष पदी शिक्षक नेते तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अत्यंत विश्वासु कार्यकर्ते राजहंस शहापुरे यांची निवडा झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ शाखा कंधार च्या वतीने दि.25 जुन रोजी विद्या विकास प्राथमिक शाळेत सत्कार करण्यात आला.
आज शुक्रवार दि.२२ जुन रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ शाखा कंधार च्या वतीने राजहंश शहापुरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ शाखा कंधार चे तालुकाध्यक्ष भास्कर कळकेकर,हरीहर चिवडे,बसवेश्वर मंगनाळे,दिगांबर वाघमारे ,शिवकुमार बच्चूवार,देशमुख सर आदीची यावेळी उपस्थिती होती.