नांदेड ; प्रतिनिधी
लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, मिनरल वाटर व बिस्कीट वाटप करण्यात येणाऱ्या ” सेवा ही संघटन” या उपक्रमाचे १०० दिवस पूर्ण झाले असून यानिमित्त झालेल्या शतकपूर्ती कार्यक्रमात बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी अशाप्रकारचा विक्रम भारतात पहिल्यांदाच केल्याबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले आहे.
नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रविण साले
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महानगर नांदेडच्या वतीने श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक रुग्णालय लसीकरण केंद्रात दररोज एका पदाधिकाऱ्यातर्फे साहित्य वितरण करण्यात येते. या कार्यक्रमाच्या शतकपुर्ती निमित्त
वैद्यकीय आघाडी भाजपा नांदेड जिल्हा संयोजक डॉ.सचिन उमरेकर यांच्यातर्फे सोमवारी सर्व नागरिकांना
मास्क, सॅनिटायझर, मिनरल वाटर व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा सह प्रभारी डॉ. शीतल भालके, डॉ. बालाजी माने, डॉ. विजय पवार, केदार नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांनी या अभियानात एका दिवसाचे योगदान दिले त्यांचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. दिलीप ठाकूर यांच्या समवेत एकही दिवस खंड न पडू देता सेवा करणारे अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा, कामाजी सरोदे,प्रशांत पळसकर यांचा देखील गौरव करण्यात आला. शतकपूर्ती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश व्यास,नामदेव शिरसाट,चक्रधर खानसोळे,विजय सुरवसे,आकाश पाटील, राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती यांनी परिश्रम घेतले. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत लसीकरण सुरू राहील तोपर्यंत नांदेडच्या नागरिकांना ही सेवा देणार असल्याचा निर्धार संयोजक
दिलीप ठाकूर यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.