राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त कंधार येथे वृक्षरोपन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथिल सामजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ कदम यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज मतिमंद विद्यालय येथे आज दि.२६ जुन रोजी वृक्षरोपन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हादराव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, वैजनाथ जक्कलवाड, माणिकराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते या वृक्षरोपण कार्य कार्यक्रमासाठी आणि टायगर ग्रुप महाराष्ट्राचे आकाश गायकवाड ,श्रीनिवास सारळे यांच्या विशेष उपस्तीथित कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी लखन कोळेकर, मुन्ना कदम यांचीही उपस्थिती होती. राजर्षी शाहू महाराज मतिमंद विद्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *