कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमिपूजन सोहळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोमवार दि.२८ जुन रोजी आयोजित करण्यात आला होता. सदरील शासकीय कार्यक्रमात नांदेड व लातूर चे खासदार व मुखेड चे आमदार यांचे नावे नसल्याने भाजपा कर्यकर्त्यांनी जाब विचारताच आमदार श्यामसूंदर शिंदे व भाजपा कार्यक्रत्यात शाब्दिक चकमक उडाल्याने कार्यक्रमात शाब्दीक चकमक होत राडा झाला.
आज दि २८ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमिपूजन सोहळा प्रसंगी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सदरील कर्यक्रम प्रसंगी भाजपा चे तालुकाध्यक्ष भगवान राठोड व शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनि नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे व कंधार मुखेड चे आमदार डॉ तुषार राठोड यांनी नावे प्रोटोकॉल नुसार नाव नसून त्यांना निमंत्रण ही नसल्याचे प्रशासनास निदर्शनास आणून लोकप्रतिनिधी नसलेल्या आशाताई शिंदे यांची फोटो फलकावर का अशी विचारणा भगवान राठोड आणि करताच या वेळी आमदार महोदय यांनी यांनी उडी घेतली व भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड सह भाजप कार्यकर्त्यां दमदाटीची भाषा वापरली त्या ह्या मुळे कार्यक्रम स्थळी एकाच गोंधळ उडाला त्या वेळी पोलिसांनी बाळाचा वापर करून भाजपा कार्यकर्त्याना बाहेर काडले या बाबीचा भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध करत काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला.