फळ पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांचे आवाहन

नांदेड दि. 28 :- जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा मृग बहार ही योजना मोसंबी, लिंबू व सिताफळ या अधिसूचित पिकांसाठी अधिसुचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2021-22 या वर्षासाठी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि. स्टॉक एक्चेंच टॉवर्स 20 वा मजला दलाल स्टिट्र फोर्ट मुंबई 4000 23 यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

मृग बहार विमा हप्ता दर हा पुढीलप्रमाणे आहे.

मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 4 हजार रुपये. लिंबु पिकाची विमा संरक्षित रक्कम (नियमित) 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 3 हजार 500 रुपये तर सिताफळ फळासाठी विमा संरक्षण 55 हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा 2 हजार 750 रुपये एवढा आहे.

योजना अंमलबजावणी वेळापत्रक

व अधिसुचित मंडळात ही योजना पुढे दर्शविल्याप्रमाणे जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांना व अधिसुचित महसुल मंडळांना लागू राहिल. मृग बहार अधिसुचित महसूल मंडळात अधिसुचित फळपिक मोसंबी पिकासाठी कंधार तालुक्यातील बारुळ, फुलवळ. धर्माबाद- करखेली. नांदेड- लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर. मुखेड- मुखेड, जाहुर. मुदखेड- मुदखेड, बारड. हदगाव- हदगाव, पिंपरखेड तर लिंबु पिकासाठी उमरी या अधिसुचित महसूल मंडळासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. तर सिताफळ पिकासाठी कंधार तालुक्यात बारुळ व कंधार तर हदगाव तालुक्यात तामसा, मनाठा, आष्टी व पिंपरखेड या अधिसुचित महसूल मंडळात पिक विमा भरण्याची मुदत 31 जुलै 2021 अशी आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

एका शेतकऱ्यास अधिसुचनेनुसार 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत नोंद करता येणार आहे. जिल्ह्यात सन 2021-22 या वर्षासाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेंतर्गत मृग व अंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासन निर्णय समजून मुदतीत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी, संबंधित विमा कंपनी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *