आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

कंधार प्रतिनिधी

कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन काल सोमवार दि.28 जून रोजी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे प्रमुख उपस्थिती होत्या,

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कंधारचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नायब तहसीलदार विजय चव्हाण, उपविभागीय अभियंता सुरेश जोशी, पोलीस निरीक्षक झुंजारे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पा. चोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे ,उपसभापती अरुण पा कदम, नगरसेवक मनानं भाई चौधरी, ख. वि. संघाचे उपसभापती शाम आण्णा पवार,संचालक ,युवा नेते रोहित पाटील शिंदे, शेकाप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख शेरु भाई, अजीम भाई, तालुकाध्यक्ष अवधूत पेटकर प्रमुख उपस्थिती होते , यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की कंधार येथील महसूल कर्मचाऱ्यांचा निवासस्थानाचा प्रलंबित विषय लवकरच मार्गी लावल्या जाईल यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे आमदार शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले, लोहा, कंधार मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन गोरगरिबांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे असेही यावेळी शिंदे यांनी बोलताना सांगितले,

लोहा, कंधार मतदार संघातील विविध शासकीय कार्यालयाच्या नूतन बांधकामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून लोहा ,कंधार मतदार संघातील सर्व सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षण ,रोजगार, दळणवळण ,शेती कृषी विकास या बाबी चा विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना आमदार शामसुंदर शिंदे यांनी स्पष्ट केले, यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर,बंटी गादेकर, नारायण सावकार, सुनील सदलापुरे, संचालक अनिकेत जोमेगावकर श्याम पा.सावळे, प्रवीण मंगनाळे, विश्वंभर पाटील ,राष्ट्रपाल चावरे, सद्दाम कंधारी ,प्रताप शिंदे सह विविध विभागाचे अधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *