कंधार ; प्रतिनिधी
ओबीसी राजकीय आरक्षण पुर्ववत करण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती कंधार च्या वतीने आज दि.२८ जुन रोजी कंधार तहसील कार्यालयासमोर टाळ-मृदंग बजाओ आंदोलन करण्यात आले….
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मागासवर्गीय अधिकारी /कर्मचारी यांना पदोन्नती आरक्षण लागू करावा.
या मागणीसाठी ओबीसी आरक्षण समिती कंधार च्या वतीने लक्षवेधी असे टाळ बजाओ आंदोलन करून केंद्र व राज्य सरकार लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले .
यावेळी शिवानंद हैबतपुरे, रामचंद्र येईलवाड, चंद्रशेन पा गोंडगावकर, गणेश कुंटेवार, शिवा नरंगले, उत्तम चव्हाण, माधव मुसळे, सतीश देवकत्ते, अंगद केंद्रे, बालाजी चुकलवाड, भगवान राठोड, गंगाप्रसाद यन्नावार, राजकुमार केकाटे, मारोती मामा गायकवाड, बाळासाहेब पवार, सुरेश कल्हाळीकर, माधव गित्ते, सुरेश राठोड, सौ सुनंदा भोसीकर, अंजली कांलिदे, गोपीनाथ केंद्रे, सूरेश चिंतेवार, वैजनाथ गिरे, अहमद पठाण, अरूण करेवाड, अजिंक्य पांडागळे, प्रविण कच्चवा, पप्पू मुसळे, राजीव केंद्रे, रमेश जाधव, सचिन जाधव, किशन श्रीरामे, माधव पुंनवाड, तन्नविरद्दीन, शंकर डिगोळे, यासह विविध समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनास पाठिंब्यास आमदार शामसुंदर शिंदे, नियोजन समिती सदस्य बालाजी पांडागळे, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट देऊन सक्रिय पाठिंबा दिला.
यावेळी अॅड शिवानंद हैबतपुरे, रामचंद्र येईलवाड, चंद्रशेन पाटील (जि प सदस्य), प स सदस्य उत्तम चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, यांनी ओबीसीची भुमिका मांडली.सुञसंचालन सतीश देवकत्ते यांनी केले तर
आभार गणेश कुंटेवार यांनी मानले,