मुंबई दि (प्रतिनिधी) १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती, महाराष्ट्राला लाजवेल असे कृत्य जातीवादि मानसिकतेतून घडले होते, महाराष्ट्र बंद च्या हाकेत हजारो तरुणांवर केसेस दाखल करण्यात आले, आज ३वर्ष होऊनही केसेस मागे का घेतल्या नाहीत असा जाहिर सवाल पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे सरकारला विचारला आहे.
पँथर डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, आजही आरोपींवर कारवाई झाली तर नाहीच परंतु; निषेधार्थ महाराष्ट्र बंद च्या हाक मधील बौद्ध व आंबेडकरी आंदोलनकर्त्यांवर त्याकाळात केसेस घेण्यात आल्या. कित्येकांना तुरुंगात डाम्बण्यात आले. नव युवकांचे शैक्षणिक आयुष्य बरबाद झाले, त्या काळात बौद्ध/आंबेडकरी युवकांवर घेण्यात आलेल्या केसेस सरकार कधी माघारी घेणार की बौद्ध तरुनांचे आयुष्य या सरकारला बरबाद करावयाचे आहे(?)
मराठा आंदोलन झाले यावेळी हजारो युवकांवर केसेस दाखल करण्यात आले होते मात्र : तूर्तास या सरकारने त्या कैसेस मागे घेऊन मराठा तरुणांचे भविष्य मोकळे करून दिले. मग बौद्ध तरुणांवर असा भेदभाव का?
असाच मनाचा मोठेपणा हे आघाडी सरकार बौद्ध/आंबेडकरी तरुणावर दाखवेल काय(?) त्यांच्यावरील दाखल केलेल्या सर्व केसेस मागे घेणार काय, असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.
आघाडी सरकारला सत्तेत राहूनही बौद्ध/आंबेडकरी तरुणावर दाखल केलेले केसेस मागे घ्यायचे नसतील तर त्यांच्याच मतावर निवडून येऊन त्यांचे भविष्य अंधारात ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही.
लवकरच या केसेस मागे नाही घेतल्यास रिपाइं डेमॉक्रॅटिक राज्यभर तीव्र आंदोलन करेल व उमटणार्या सर्व पडसादाला स्वतः सरकार जवाबदार राहील असा इशाराही डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.