कंधार ; प्रतिनिधी
उर्ध्व मानार प्रकल्प (लिंबोटी) ता.लोहा जि. नांदेड या प्रकल्पातून कंधार लोहा तालुक्यासाठी उजवा कालवा मंजुर करण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दि.२६ जुन रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे ओबीसी विभाग प्रदेश सचिव अंगद केंद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लिंबोटी येथे मानार नदीवर उर्ध्व मानार प्रकल्प आहे. त्या प्रकल्पातून पूर्वी डावा कालवा पूर्ण झाला आहे. आणि त्या पासून सिंचनास सुध्दा सुरूवात झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन सिंचनाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे परंतू याच धरणाच्या उजव्या बाजूला असलेली गावे वहाद, हासुळ, कार्तळा, कुरूळा, नागलगाव, उमरगा, हाडोळी (ब्र.), दिग्रस आदि गावे सिंचना पासून वंचित आहेत त्यांना वर्षातून ८ महिने पिण्यासाठी सुध्दा पाणि मिळत नाही. पर्यायाने हि गावे दुष्काळग्रस्त आहेत. म्हणून या प्रकल्पावर उजवा कालवा झालातर या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली निघुन त्यांचे जिवन समृध्द होईल. म्हणून या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या प्रश्नाकडे लक्ष घालून न्याय द्यावा व या प्रकल गावरील उजव्या कालव्यास मंजूरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे ओबीसी विभाग प्रदेश सचिव अंगद केंद्रे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.