नांदेड ; प्रतिनिधी
भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी मुंबई येथे आज दि.३० जुन रोजी co vaccine कोरोना प्रतिबंधक पहिली लस घेतली असून लस सुरक्षित आहे.
मी स्वतः लस घेतली आपण मतदार बांधवांनी व कार्यक्रत्यांनी सुद्धा लसीकरण करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
लसीकरण ही काळाची गरज आहे आपले घर ,घरातली व्यक्ती आणि समाज सोबतच देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः लस घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी आवाहन केले आहे.