कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरात भिमगड स्थीत सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची ३ एकर मोकळी जागा आहे त्याठिकाणी विविध प्रकारचा विकास होण्यासाठी व कंधार शहरातील दलीतवस्त्यामध्ये विकास साधण्यासाठी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक कॉग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी केली आहे.
कंधार शहरातील भिमगड स्थीत सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची ३ एकर मोकळी जागा आहे. स्मारकाच्या ठिकाणी मोठे सभागृह, विद्यार्थासाठी वाचनालय, अभ्यासिका केंद्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यास शहरासह तालुक्यातील जनतेस व विद्यार्थ्यांस सभागृहाचा व वाचनालय अभ्यासिका केंद्राचा लाभ होणार आहे.
त्यामुळे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मारकास निधी उपलब्ध करून द्यावा.तसेच दलित वस्त्यांमध्ये कंधार शहरातील बौद्ध द्वार नगर, प्रियदर्शनी नगर, साठेनगर, सिध्दार्थ नगर, महात्मा फुले कॉलनी,विजयगड, भिमगड,रामरहिम नगर,फुले नगर या करीता आपण दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सि.सि.रस्ते,नाली,पथदिवे,
सभागृह,फेवर ब्लॉक यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक कॉग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी केली आहे.