हक्कभंग समितीकडे तक्रार करणार..!
कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथे दिनाक 28जुन रोजी उपविभागीय इमारतीचे भुमीपुजन कार्यक्रमात शासकीय प्रोटोकॉल पाळला नसल्याने भाजप कार्यकृर्यांनी राडा घातला होता. या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.गोंधळ घालणाऱ्या भाजप कार्यकृर्त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी रात्री उशीरा पर्यंत आमदार पोलीस स्थानकात बसुन होते. त्यामुळे गुन्हे गोंधळ घालणाऱ्यांवर199/202क्र.43,147,149,352,353आय.पी.सी.नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.आमदार यांच्या तक्रारीवरुन 353 सारखे गुन्हे दाखल करता येत नाहीत आणि झाल ते योग्य नाही ,या संदर्भात हक्कभंग समितीकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार तुषार राठोड यांनी दिली आहे.
कंधार येथिल उपविभागीय ईमारतीचे भुमीपुजन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम होता परंतु प्रशासनाच्या वतिने कसल्याच प्रकारची निमंत्रण पत्रीका काढण्यात आली नव्हती. स्टेज बॕनरवर आमदाराच्या सौवभाग्यवती यांची फोटो छापण्यात आली होती परंतु कंधार तालुक्याचा 40टक्के भाग मुखेड मतदार संघात आसताना डाॕ.तुषार राठोड यांची फोटो छापण्यात आली नव्हती किंव्हा मुखेड नियमा नुसार त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.त्यामुळे भाजप कार्यकृर्त्ये चांगलेच आक्रमक होऊन गोंधळ घातला.या गोंधळामुळे तलुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चा झाली.आ.शिंदे यांनी रात्री उशीरा पर्यंत पोलिस स्टेशनमाध्ये बसुन पोलीसांना गुन्हे दाखल करण्यास लावले आहे.
या सर्व प्रकारामुळे आता दाजी भावजीचे चांगलेच राजकारण तापले आहे..सोशल मिडियावर शिंदे आमचे दाजी नसते तर शिपाई सुधा राहिले नसते अशा पोस्ट चिखलीकर समर्थकांकडुन टाकण्यात आल्या आहेत तर चिखलीकर आमचे मेहुने नसते तर ग्राम पंचायतचे सदस्य पण राहीले नसते अशा पोष्ट टाकण्यात आल्या आहेत.यात आता मुखेडचे आमदार डाॕ.तुषार राठोड यांनी उडी घेतली असुन काल घडलेला प्रकार हा निदनिय आहे.शासकीय अधिकारी यांनी शासकीय प्रोटॉकल पाळला नाही.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या विरोधात मि हक्कभंग समितीकडे तक्रार मांडणार आहे.काल पोलीसानी आमदारांच्या तक्रारीवरु भाजप कार्यकृर्त्यावर 353सारखे गुन्हे दाखल केले आहेत ते योग्य नाही.
आमदारांच्या तक्रारीवरुन 353सारखे गुन्हे दाखल करता येत नाहीत.अशाच प्रकार चालु राहीला तर उद्या ग्राम पंचायत सदस्य पण 353दाखाल करण्याच्या तक्रारी देतील.मला आमदाराबद्दल काही बोलायच नाही परंतु मी हक्कभंग समितीकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहीती आमदार डाॕ.तुषार राठोड यांनी दिली आहे.