साहित्य, समाज, शैक्षणिक, आर्थिक, क्षेत्राविषयी प्रबोधन करण्याचे कार्य डॉ. हनुमंत भोपाळे यांच्या कडून

मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन इतरांना प्रेरणा, सन्मान आणि मार्गदर्शन करतात. सरांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असंख्य मानस जोडली आहेत. छोट्या माणसाला मोठे कसे करावे, प्रगतीचा मार्ग कसा दाखवावा, गरीब माणसाचाही आदर कसा करावा, दुसर्याच्या भावना समजून घेऊन कसे वागावे हे डॉ. हनुमंत भोपाळे सरांकडून शिकण्यासारखे आहे. सर अत्यंत प्रेमाने वागवतात..!

यामुळे सराविषयी चांगल बोलणारी, लिहिणारी माणस आहेत. सरांविषयी त्यांचे विद्यार्थी, सहकारी, मित्र, गुरु, अन कुटूंबीयांनी लेख लिहिले आहे. त्यांना अनेकांने पत्र पाठविलेले आहेत. त्यांच्या पुस्तकाविषयी देखील अनेक लेख लिहिल्या गेले आहेत. मला वाटले की, सरांविषयी लिहिलेले हे सर्व समाजा समोर आले तर समाजाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. सरांना मी माझ्या लहानपणापासूनच ओळखतो. कारण त्यांचे आणि माझे गाव एकच आहे.

आमचे गाव नायगाव तालुक्यातील दरेगाव (जि.नांदेड) हे आहे. सरांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि नवयुवकांना, विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक घटकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांचा गौरव झाला पाहिजे असे मला वाटत राहिले. सरांविषयी गौरवग्रंथ प्रकाशित करत असताना मला विलक्षण आनंद होतो ही संधी मला मिळाली हे माझ्या भाग्य समजतो. त्यांच्याविषयी पुस्तक काढण्याची संधी मिळणे खरच मला माझाही गौरव वाटतो.

मला लहानपणापासूनच सराविषयी आदर वाटत आला आहे. सराना आमच्या गावात अनेकजन मानतात. अनेक विद्यार्थी त्यांना आदर्श ठेवून वाटचाल केली. आज ते चांगल्या पदावर पोहोचले आहेत. गावातले वरिष्ठ माणस म्हणतात. भोपाळेच्या हानमंत सारख लेकरांनी बनल पाहिजे. हे मी अनेकांनाच्या तोंडून ऐकले आहे. सर लहानपणापासून अत्यंत अभ्यासु, कष्टाळू आहेत. प्रतिकुल परिस्थितीला अनुकूल कस कराव हे सराकडून शिकण्यासारख आहे. टिकाकारालाही लाजवेल असे सर वागतात. टिकाकारांना दुर का करत नाहीत सर असे म्हटल की सर म्हणतात, आजचे टिकाकार उद्याचे गौरव करणारे होतील यावर सरांना विश्वास आहे.

त्यामुळे कोणाविषयी त्यांच्या मनात कटुता ठेवून वागत बोलत नाहीत. कोणीही आपल्या घरात कचरा टाकला म्हणून आपण तो तसाच ठेवून जगत नाही. मग दुसर्यांनी आपल्या बद्दल वापरलेले, वेदना देणारे शब्द डोक्यात कशाला ठेवायचे. कचर्याची जागा कचरा कुंडीत असते. कचरा देवघरात आणायचा नसतो. त्याप्रमाणेच नकारात्मक विचार, नकारारत्मक टिका डोक्यात ठेवून जगण म्हणजे डोक्याचा उकीरडा करुन घेणं आहे असे सरांना वाटते. हे सरांच जगन मला अनेकदा प्रेरणा देते. सर आमच्या दरेगावात त्यांच्या विद्यार्थी दशेपासून अनेक कार्यक्रम घेतात. ज्ञान दिपाची दिपवाळी, महापुरुषांची जयंती पुण्यतिथि. सराने कचरा गोळा करुन होळी करण्याचा एक अभिनव प्रयोग केलेला मी अनुभवलेला आहे. दलित समाजाविषयी सुवर्णांचे जे प्रतिकुल मत आमच्या गावत पूर्वी होत ते मत बदलण्यासाठी सरांनी दलित आणि सवर्ण हे एकच कसे आहे हे पटवून दिले आहे. त्यामुळे गावात सामाजिक एकोपा निर्माण होण्यामध्ये सरांचा फार मोठा वाटा आहे हे अनेकजन मान्य करतात. सरांची तळमळ असते माणूस हा माणूस बनुन राहीला पाहिजे. एकमेकाकडून मानसन्मान मिळाला पाहिजे. कोणतीही जात जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. हजारो वर्षे विवाह संस्थाच नसल्यामुळे आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ असे म्हणण्याला कुठला वैज्ञानिक आधार नाही हे सर फार छान पटवून देतात. प्राणी टाळ वाजवत नाहीत, पण ते एकमेकाचा विटाळ मानत नाहीत. एकमेकासोबत उच्च निच्चता न मानता वागतात. मग माणस टाळ वाजवत असतानाही विटाळ का मानत असतील ? प्राण्यापेक्षाही जी कनिष्ठ दर्जाचे असतात तीच माणस जातीच्या नावान इतरांना कनिष्ठ लेखतात असे सर जाहिरपणे अनेक ठिकाणी बोलतात. त्यामुळे काही लोक त्यांच्याविषयी मनामध्ये वैरभावना ठेवून वाईट बोलत असतात. तरी पण सर आपला समतेचा मार्ग सोडत नाहीत. हे मी अनुभवल्यामुळे सरांच मोठेपण जास्त वाटते. सर मला अनेकदा महणतात की, सोनू,

दुसर्या माणसाला मोठ करण्यासाठी आपली शक्ती खर्च करणे म्हणजे आपोआपच आपण मोठ होण असते. आपण केलेल्या उपकाराला कुणी मानल नाही, कुणी जाणीव ठेवली नाही तरी सामाजिक कार्याचा आपल्या जीवनामध्ये आत्मीक समाधानासाठी उपयोग होत असतो. हे समाधान कोठ्यावधी रुपये कमवले तरी मिळत नसते

असे सर सांगत असतात. खरच हे सरांचे विचार प्रत्येकांनी जोपासले पाहिजे असे मला मनापासून वाटते. सरांमुळे दरेगावची ओळख ती फक्त नायगाव तालुका, नांदेड जिल्हा किंवा महाराष्ट्रापूरती राहिली नसून सरांना इतर राज्यातही ओळखणारे आहेत. गोवा, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातले ही लोक सरांना ओळखतात. या राज्यात साहित्यविषयक कार्यक्रमात सरांचा सहभाग आहे.

सरांच एक पुस्तक गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते झाले, तर एका पुस्तकाच्या एका आवृतीचे प्रकाशन पंजाबच्या विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या हस्ते झाले. सरांच्या सहवासात गेलेला माणुस सहजा सहजी सरांपासून दूर जात नाही. सर पहिल्यांदा अनेकांना कडक वाटतात परंतु त्यांच्या सहवासात गेल्यानंतर कळते की, ते खुप प्रेमळ आहेत. सरांना मानस जोडायच कौशल आहे. त्यांचा तो स्वभावच आहे. त्यामुळे आज लाखो लोकांच्या सहवासात आहेत. सरांच्या मार्गदर्शनाचा खुप फायदा झाला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची मी संधी शोधत होतो. तसेच मला माझ्या गावचा अभिमान असल्यामुळे आमच्या गावचं भूषण असणार व्यकतीमत्व समाजासमोर आणाव अस मला वारंवार वाटत होत. त्यामुळे सरांना मी त्यांच्यावर विशेषांक काढण्याची परवानगी दया अस म्हणालो. तर सरांनी परवानगी दिली. त्यामुळे त्यांच्याविषयीचा विशेषांक मी प्रकाशित करु शकत आहे. अन तो मला पहिला मान मिळाला याचा मला आनंद वाटतो. आपण सर्वांनी हा विशेषांक वाचून मला प्रतिक्रया दिल्यास मी आपला आभारी राहील. पुढेही असे काम करायला प्रेरणा मिळेल. सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा..!

                         *लेखक*

✒️- युवा साहित्यिक: सोनू दरेगावकर, नांदेड..!

📲- संपर्क : ७५०७१६१५३७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *