कंधार येथील दुय्यम निबंधक मो.सुजाओद्दीन अलीमोद्दीन यांना निरोप समारंभ.

कंधार ; मो सिकंदर


कंधार येथील दुय्यम निबंधक अधिकारी मो.सुजाओद्दीन अलीमोद्दीन यांना आज निरोप समारोप देण्यात आला तर आर.सी.कऱ्हाळे पाटील यांनी दुय्यम निबंधक अधिकारी पदभार स्वीकारला असता .कंधार मुद्रांक विक्रेता संघाच्या वतिने मो.सुजाओद्दीन अलीमोद्दीन यांचा सत्कार करुन भावि आयुष्यास शुभेच्छा दिल्या .

मो.सुजाओद्दीन अलीमोद्दीन हे शिपाई पदापासुन आपल्या प्रमाणीक पणामुळे दुय्यम निबंधक अधिकारी या महत्वाच्या पदा पर्यंत बाजी मारता आली. मो.सुजाओद्दीन अलीमोद्दीन यांनी पदाला शोभेल आसे काम करुन दुय्यम निबंधक अधिकारी म्हणून अत्यंत प्रमाणीकपणे काम केले. प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार अखंडित सेवा देऊन दि.३० जुन २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले असता यथोच्छ सप्तनीक सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी कंधार तालुका मुंद्राक विक्रता संघटनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ बनसोडे व त्यांच्या टिमच्या वतिने सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभ कार्यक्रमात शुभेच्छा देताना रामभाऊ बनसोडे म्हणाले की, मो साजाओद्दीन हे माझे बालमित्र आहेत.अर्थीक परिस्थीवर मात करून अत्यंत मेहनतीने या पदापर्यंत पोचले.त्यांनी आपल्या पदाची गरीमा कधीच आपल्या सेवाकाळात येऊ दिली नाही. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक पक्षकाराला सभ्यतेची वागणूक देत सर्वांना सहकार्य केले.त्यांचा सेवानिवृत्तीच्या नंतरचे सर्व आयुष्य निरोगी,सुख समृद्धीचे जाओ अश्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी मो सुजाओद्दीन अत्यंत भाऊक झाले होते.याप्रसंगी उपस्थित मुद्रांक विक्रेते तथा दै वतनवाला वृत्तपत्राचे कंधार तालुका प्रमुख मोहम्मद सिकंदर, शिवदास गायकवाड, बाबु सावकार मुत्तेमवार, बाबुराव कांबळे,मुरलीधर धानोरकर,विजय बडवणे, शेख मकबूल,इमतीयाज उल्ल्हा,मनोहर कारामुंगे, भुजंग कारामुंगे,फेरोज खान,शेख मोईन,अॕड रामजी कांगणे,अॕड शिवराज बनसोडे,विजय मुंडे, सह कर्मचारी, एम.के.बोधगिरे, सुहास कांबळे,धोंडु तात्या बोडावार,शेकापुरे या सर्वांनी शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *