कंधार ; प्रतिनिधी
कंधार पंचायत समिती परिसरात कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त १ जुलै रोजी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विभाग पंचायत समिती कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीमेचा समारोप साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. लक्ष्मीबाई व्यंकटराव घोरबांड होते.प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य ॲड. विजयकुमार धोंडगे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण माणसपुरे, उत्तमराव चव्हाण, पंडितराव देवकांबळे, तहसीलदार कंधार व्यंकटेश मुंडे , तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख,मंडळ कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, रमाकांत भुरे, कृषी पर्यवेक्षक आत्माराम धुळगंडे,वारकड, विस्तार अधिकारी पंचायत समिती कंधार दत्तप्रसाद भारती,डी एन भारती,उजमा बेगम,टी.टी. गुट्टे, कक्ष अधिकारी आर एन तावडे ,अधिक्षक नारायण शिकरे ,कृषी सहाय्यक परमेश्वर मोरे, गोविंद तोटावाड, विजय चामले ,सतीश वाघमारे, नामदेव कुंभारे, जिवण कळणे ,भूषण पेटकर, मधुकर राठोड ,शिवाजी सूर्यवंशी, सतीश गोगदरे , कृषी सेविका अनुसया केंद्रे, शीला पानपट्टे, कल्पना जाधव उज्ज्वला देशमुख पल्लवी कचरे,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी करताना वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला तसेच कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील गावात दिनांक २१ जून ते १ जूलै यादरम्यान क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत गावोगावी कृषी संजीवनी मोहिमेचा प्रचार प्रसिद्धी केल्याबाबत सांगितले. तालुक्यातील खरीप हंगामाची सद्यस्थिती पेरणीची व पिक परिस्थितीची माहिती दिली.कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तालुक्यात राबविलेल्या वैशिष्टपूर्ण कामाबाबत माहिती देताना बिगरहंगामी सोयाबीन बीजोत्पादन, उगवण क्षमता चाचणी बीजप्रक्रिया, रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड,रासायनिक खतांचा संतुलित वापर,एक गाव एक वाण, फळबाग लागवड तसेच रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा कृषी संजीवनीमध्ये सहभाग या बाबत विस्तृत माहिती दिली कृषी विभागामार्फत योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी बाबत माहिती दिली.
फळबाग विमा योजना तसेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना या बाबत माहिती
फळबाग विमा योजना तसेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना या बाबत माहिती दिली. रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.हरभरा या पिकासाठी सर्वसाधारण गटातून एकूण दहा शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करून प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी सर्वाधिक उत्पादकता घेतलेले श्री योजनेत यावेळी पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुकास्तरावरील सर्वाधिक उत्पादकता घेतलेले बारूळ येथील शेतकरी श्री आनंदा पंढरी वळशिंगे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी रब्बी हंगामात हेक्टरी ३६ क्विंटल एवढे उत्पादन घेतले यानंतर मुन्ना गंगाधर खाडे राहणार नांगलगाव या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे २८.५० क्विंटल उत्पादन काढले ,मौजे संगुचिवाडी येथील शेतकरी खुशाल बाबुराव कुंभारे यांनी स्पर्धेतील तिसरे पारितोषिक पटकावले त्यांना हेक्टरी उत्पादकता २८ क्विंटल उत्पादन मिळाले या सर्व विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले पंचायत ? बाबत अपेक्षा व्यक्त केली. कृषी दिनानिमित्य तालुकास्तरीय पीक स्पर्धा आयोजित केलेल्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे कौतुक केले व भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांमध्ये उत्पादकता वाढवण्याबद्दल प्रोत्साहित करावे असे आवाहन केले. तहसीलदार कंधार व्यंकटेश मुंडे यांनी आपले विचार मांडताना कृषी विभागाने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तसेच तालुक्यातील फळबाग लागवडीकडे व वृक्षतोडीच्या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले . अध्यक्षीय समारोप सभापती यांनी केला व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर पंचायत समिती आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला.