नागपूर ते बोरी बुटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 लगत असलेलं पारडी तालुका लोहा या गावात शिवराज पांडुरंग पवार यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.पारडी गावात जि.प.प्रा. शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लोहा येथील कै.वि.नळगे मा. व उ.मा. विद्यालयात तर श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात पदवी घेऊन पदव्युत्तर पदवी नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालय, पिपल्स कॉलेज नांदेड येथे झाले.एम.ए.(मराठी)एम.ए.(इतिहास)सह बी.एड्, बी.लीब.असे उच्चशिक्षित व्यक्तीमत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण केली.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. यानंतर अनेक ठिकाणी सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतला.
प्रेरक म्हणून काम करत असताना प्रेरकांची मानधनवाढ, प्रलंबित मानधन त्यांच्या अन्य मागण्यांसाठी राज्यशासन ते केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. जिल्हा निकाली कार्यालय, जिल्हा परिषद,पुणे संचालक कार्यालय, नागपुर हिवाळी अधिवेशन, मुंबई मंत्रालय,दिल्ली संसद भवन वर प्रत्येकी तीन ते चार वेळा आंदोलने करून त्यात सिंहाचा वाटा शिवराजचा. आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करीत आपले मार्गक्रमण सुरू ठेवले. प्रेरकांच्या कार्यासाठी त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.
नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात वळले शांत संयमी आपल्या लेखणी वर विश्वास ठेवून काम करण्यात ते धन्यता मानतात. गोरगरीब दीनदलित,कष्टकरी, अल्पसंख्यांक,भटके यासह शेतकऱ्यांचे प्रश्न अन्य अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी आपली लेखणी झिजवण्यात धन्यता मानतात. निर्भीड आणि निपक्ष व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे ते सध्या महाराष्ट्र बहुजन प्रेरक-प्रेरिकांचे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक,शैक्षणिक,पत्रकारिता यामध्ये त्यांना आवड आहे.
राज्यातील पत्रकारांवर अनेक वेळा हल्ले होतात त्यांना न्याय द्यावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची स्थापना डी.टी.आंबेगावे यांनी केली. “शिवराज” च्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. ती समर्थपणे ते सांभाळत असून पत्रकारांना न्याय देण्यात संदर्भात आवाज उठवितात.जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.वसंत बिरादार,संजीवकुमार गायकवाड यांची त्यांना नेहमीच साथ असते.
पत्रकारांच्या गृहनिर्माण तसेच तालुकास्तरावरील आजारी असणाऱ्या पत्रकारांसाठी उपचारासाठी मदत मिळावी यासाठी ते सतत कार्य करत आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असून तळमळीने काम करत आहेत
एखादा नवीन मित्र तयार केला तर ते त्यांना कधीच विसरणार नाही. ही जादू शिवराजकडे आहे. कितीही राग आला तर रागावर नियंत्रण ठेवून काम करणारा त्यावर मार्ग काढणारा हा “शिवराज” तेथे उपस्थित राहून आपल्या प्रश्नांना न्याय कसा मिळेल यासाठी तळमळीने कार्य करतो.
सध्या “शिवराज” दैनिक हिंदू सम्राट, दैनिक वतनवाला, राजमुद्रा लाईव्ह न्यूज,महा 24 न्यूज, स्वराज्य 24 तास न्यूज च्या माध्यमातून त्यांचे कार्य चालू आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा शिवराजचा आज वाढदिवस त्यांच्या हातून भविष्यातही असेच कार्य होत राहो. वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा…
साहेबराव सोनकांबळे
लोहा.मो.नं.९९२१८९३३२५