पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे यांच्या हस्ते कंधार तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण

कंधार .

हरितक्रांतीचे प्रणेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी १ जुलै रोजीकंधार तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार व्यंकटेश मुंडे पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे यांच्या हस्ते वृक्षारोपण कृषी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार सुर्यकांत ताटेवाड, नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसीलदार राजेश पाठक, संगांयो विभागाचे महसूल सहाय्यक बारकुजी मोरे, पेशकार अविनाश पानपट्टे, पोलिस कर्मचारी सुनिल पत्रे, निवडणूक समन्वयक मन्मथ थोटे, अजय गाजरे, शेख नदीम, सितळकर, इस्माईल मिर्झा, माणिक पितळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *