नायगाव तालुक्यातील इज्जतगाव मनुर ( त.ब.) अंतरगाव या गावातील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलचे वाटप करा :- विक्रम पाटील बामणीकर

विद्यार्थ्यांना करावे लागते १० किलोमीटर शाळेसाठी पायी प्रवास यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नांदेड ; प्रतिनिधी

नायगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून इज्जतगाव मनुर ( त.ब.)अंतरगाव या भागात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेअंतर्गत एकही बस सेवा उपलब्ध नाही व साधी बसही वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जाणे पाच किलोमीटर आणि येणे पाच किलोमीटर असे मिळून रोजचा दहा किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षण घेण्याची वेळ या भागातील विद्यार्थ्यांवर व विद्यार्थिनी वर गेल्या अनेक वर्षपासून चालू आहे या भागात मानव विकास योजनेअंतर्गत कोणतीही बस चालू नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना मानव विकास बस चालू करावी किंवा मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना सायकलीचे मोफत वाटप करण्यात यावे यासाठी मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे वरील विद्यार्थ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे.


नायगाव तालुक्‍यातील अंतरगाव मनुर ( त.ब.)इज्जतगाव या
आजच्या घडीला या विद्यार्थ्यांना दरोज १० किलोमीटर पायी प्रवास करून आपले भवितव्य घडविण्यासाठी त्यांना बरबडा येथे चालत येण्याची वेळ गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ लक्षात घेऊन मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ बरबडा अंतरगाव मनुर ( त.ब.)इज्जतगाव या परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मानव विकास योजनेअंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात यावे किंवा मानव विकास योजनेअंतर्गत मोफत विद्यार्थ्यांसाठी बस सेवा चालू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना १० किलोमीटर पायी चालत शिक्षण घेण्याची वेळ येणार नाही व विद्यार्थ्यांना पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात यावे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मध्ये शिक्षण रुजवण्याची वरती व रुजविण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत विविध योजना आहेत याचा फायदा नायगाव तालुक्यातील मनुर ( त.ब.) इज्जतगाव अंतरगाव या ग्रामीण भागातील मुलीही उच्च शिक्षणापर्यंत मजल मारताना दिसत आहेत पण मनुर ( त.ब.) इज्जतगाव अंतरगाव या परिसरातील विद्यार्थिनींना चक्क शिक्षण घेण्यासाठी दररोजचा जाने ५.व येने ५.किलोमीटरचा मिळून प्रवास १० किलोमीटर चा करावा लागत आहे पायी प्रवास करून शिक्षण घेण्याची वेळ आत्ताच्या घडीला आली आहे त्यामुळे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला की नाही अशा भावना देखील या विद्यार्थ्याकडून ऐकावयास मिळत आहेत कारण आताचे युग कॅम्पुटरचे लॅपटॉपचे आहे त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना दररोजचा १० किलोमीटर प्रवास करून शिक्षण घ्यावे लागत आहे हे मात्र खेदाची बाब आहे.

त्यामुळे तात्काळ जिल्हाधिकारी साहेब यांनी शाळा सुरु होण्या अगोदर नायगाव तालुक्यातील अंतरगाव मनुर ( त.ब.) इज्जतगाव या परिसरातील विद्यार्थिनी साठी मानव विकास योजनेअंतर्गत तात्काळ सायकलीचे वाटप करण्यात यावे किंवा मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा चालू करून विद्यार्थ्यांची होणारी दयनीय अवस्था तात्काळ थांबविण्यात यावी

अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *