नांदेड जिल्हा क्राईम ;
१) महावितरणचे गोदामातुन चोरी :
लोहा :- दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे १६.०० ते दि. २९.०६.२०२१ चे १०.३० वा. चे दरम्यान, महावितरण कार्यालयाचे पाठीमागील गोदाम लोहा ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील अज्ञात आरोपीतांनी महावितरण कार्यालयाचे पाठीमागील गोदामाचे खिडकीतुन आत प्रवेश करुन आतील किटकॅट व फ्युज किंमती ४४,५००/- रुपयाचे साहित्य चोरुन नेले. वगैरे वरुन फिर्यादी ऋषीकांत वासुदेव जांभूळे, वय ३२ वर्षे, व्यवसाय नौकरी सहाय्यक अभियंता महावितरण उपविभाग कार्यालय लोहा यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरनं १२२ / २०२१ कलम ४६१, ३८० भादंवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन, तपास पोहेकॉ/१७५४ सुर्यवंशी, मो.क्रं. ७०५७५२४१३४ हे करीत आहेत.
२) खुनाचा प्रयत्न :
दिनांक : ०२/०७/२०२१
वजीराबाद : दिनांक ३०.०६.२०२१ रोजी चे ०३.३० वा. चे सुमारास, आरोपीचे घरा समोर बरकतपुरा नांदेड येथे, यातील फिर्यादीचा लहान चुलत भाऊ यास गल्ली मध्ये खेळण्याच्या कारणावरुन आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादी व फिर्यादीचा चाचा यांना शिवीगाळ करुन आरोपीने तलवारीने मारुन गंभीर दुःखापत केली. व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वगैरे फिर्यादी शेख उमर पि. शेख मुजीब, वय २३ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. मस्जीदच्या समोर समीराबाग नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे वजीराबाद गुरनं २१० / २०२१ कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि सह कलम ४ / २५ भाहका कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि श्री शिवराज जमदाडे, मो.क्र. ९८९०३९६६५२ हे करीत आहेत.
३) मो. सा. चोरी :
वजीराबाद :- दिनांक ०१.०७.२०२१ रोजी चे १०.०० वा. चे सुमारास, गुरूद्वारा गेट नं-२ नांदेड येथे, यातील फिर्यादीची होंडा शाईन कंपणीची मो सा क्रमांक एमएच २६ / एवाय ३९६२ किंमती ४५,०००/ रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. वगैरे फिर्यादी शरणपालसींग दिपसींग बंड, वय २३ वर्षे, रा. बाबादीपसिंघ नगर नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे वजीराबाद गुरनं २११/२०२१ कलम ३७९, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/२४२७ राठोड, मो क्रं ९८३४५५२९५७ हे करीत आहेत.
४)ट्रक चोरी :
विमानतळ :- दिनांक ०१.१२.२०२० रोजी चे १०.०० ते दिनांक ३१.१२.२०२० चे २०.०० वा. चे दरम्यान, फिर्यादीचे घरा समोर नाथनगर नांदेड येथे, यातील फिर्यादीची ट्रक क्रमांक एमएच २६ / एडी ०६७६ किंमती १०,००,०००/- रुपयाची घरा समोर लावली असता यातील नमुद आरोपीने चोरुन नेली. वगैरे फिर्यादी जयश्री पि. शिवराज बुरपल्ले, वय २४ वर्षे, व्यवसाय गृहणी रा.नमस्कार चौकाजवळ नाथनगर नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे विमानतळ गुरनं २००/ २०२१ कलम ३७९, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/ श्री ठाकुर, मो क्रं ९८२३१३२६९० हे करीत आहेत.
५) चोरी :
१) उस्माननगर :- दिनांक २७.०६.२०२१ रोजी चे १८.०० ते दि. २८.०६.२०२१ चे १४.०० वा. चे दरम्यान, मौ. वाका ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे शेतामधील विहीरीती बोअरची मोटार, स्टाटर, वायर व पाईप किंमती ४४,०००/- रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. वगैरे फिर्यादी मारोती गंगाराम झुलवाड, वय ४० वर्षे, व्यवसाय शेती रा. वाका ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे उस्मानगर गुरनं १९५/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि श्री केंद्रे, मो.नं. ९८२३४१५०२९ हे करीत आहेत.
२) हदगाव :- दिनांक ०१.०७.२०२१ रोजी चे ००.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचे आखाडयावरुन शिरड रोड शिवार ता. हदगाव जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे शेतात आखाडयावर ठेवलेले फवारणीचे पेट्रोलपंप व सौर पॅनर जुने वापरते किंमती रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेलं. वगैरे फिर्यादी अंकुश दाजीबा कल्याणकर, वय ३२ वर्षे, व्यवसाय १०,०००/ शेती रा. शिडर ता. हदगाव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हदगाव गुरनं १६२/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ/२८१७ मुंडीक, मो.नं. ८३२९७५९४१३ हे करीत आहेत.
६) गंभीर दुखापत :
१) बारड : दिनांक २६.०६.२०२१ रोजी चे १९.०० वा. चे सुमारास, फिर्यादीचे शेतात निवया शिवार ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन गैरकायदयाची मंडळी जमवून हातात काठ्या घेवुन फिर्यादीचे शेतात अनाधिकृत प्रवेश करुन टिन पत्र्याचे शेड टाकुन अतिक्रमण केले असता, फिर्यादी व त्यांची मुले विचारणा केली असता फियांदीचे डोक्यात, उजव्या खांदयावर, उजवे हाताचे मनगटावर मारुन मनगटाचे हाड फॅक्चर केलं, कमरेच्या उजव्या बाजुच काठीने मारहाण व शिवीगाळ करुन, गंभीर दुःखापत केली आहे. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी आनंदा माणिका आऊलवाड, दय ६० वर्षे, व्यवसाय शेती रा. निवघा ता. मुदखेड जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे बारड गुरनं ६६/२०२१ कलम ३२५, ४४७, ४४८, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ ५०६, भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ/ ४२३ किडे, मो.क्र. ९८२३६११४२३ हे करीत आहेत.
७) शासकीय कामात अडथळा :
१) बिलोली :- दिनांक ३०.०६.२०२१ रोजी चे २१.३० वा. चे सुमारास, विठोवा मंदीर सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी हा आपले मदतनीस सह डीपी व लाईट जोडण्याचे काम करीत असतांना यातल नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण केली व मदतनीस यास पण मारहाण केल्याने त्याचे डावे. हाताचे खोपरास मार लागल्याने सुज आली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी बाजीराव सायना आकुलवार, वय ५७ वर्षे, व्यवसाय नौकरी लाईनमॅन रा. सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे बिलोली गुरन १२५/२०२१) कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३३२ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोउपनि/ श्री सनगले, मो.क्र. २८२३८६४०५८ हे करीत आहेत.
२) लोहा :- दिनांक ०१.०७.२०२१ रोजी चे १३.३० वा. चे सुमारास, लोहा नांदेड रोडवर सायाळकडे जाणारे रोडच्या आलीकडे ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीस साईड का दिली नाही या कारणावरून मो सा आडवी लावुन फिर्यादीच्या शर्टचे कॉलर पकडुन नाकावर, छातीवर, पाठीवर थापड बुक्यांने मारहाण केली व नाकावर मारल्यामुळे घना फोडुन दहशत निर्माण करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी रामदेव मनोहर सुरनर, वय ४४ वर्षे, व्यवसाय बस चालक रा. गोंडगाव ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरन १२१/२०२१ कलम ३५३, ३३२ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास पोनि/ श्री तांबे, मो.क्र. ९८५०९८८१०० हे करीत आहेत.
८) विवाहीतेचा छळ :
मुखेड :- दिनांक २०.०६.२०२१ चे पुर्वी पासुन, फिर्यादीचे नांदते घरी व माहेर सावरगाव ता. मुखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादी बाईस, तुझ्या माहेरहुन गाडी घेण्यासाठी १,००,०००/- रुपये घेवुन ये म्हणुन शिवीगाळ व मारहाण करुन, चारीत्र्यावर संशय घेवुन, उपाशी पोटी ठेवून, शारिरीक व मानसिक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे वरुन फिर्यादी २४ वर्षीय महीला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुखेड गुरनं १९९/२०२१ कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/ २०४६ कामजळगे, मोक्र ८८०५९५७४०० हे करीत आहेत.
९) जुगार :
नांदेड ग्रामीण :- दिनांक ३०.०६.२०२१ रोजी चे २३.०५ वा. चे सुमारास, वाजेगाव ते चंदासिंग कॉर्नरकडे येणारे रोड लगत शेख फारूख यांचे बिल्डींगचे बाजुला मोकळया जागेत नांदेड येथे, यातील नमुद अकरा आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या तिरंट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी २०,१६०/ रुपये व साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोना/ २४३४, प्रमोद गोविंदराव कन्हाळे, ने. पोस्टे नांदड ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन ४६० / २०२१ कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा दाखल असुन तपास पोना/२३०६ चंचलवाड, मो.नं. ९७३०९९२३६१ हे करीत आहेत.
१० ) प्रोव्हिबीशन :
भोकर:- दिनांक ०१.०७.२०२१ रोजी चे १६.४० वा. चे सुमारास, जुन्या नगरपालीका जवळ समतानगर भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या, देशी दारु भिंगरी संत्रा किंमती २८८०/ रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोना/ २९३८ संजय भुजंगराव शिंदे, ने. पोस्टे भोकर यांचे फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरन २३०/ २०२१ कलम ६५ (ई), महाराष्ट्र प्रो कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/ १७९१ राठोड, मो.क्र. ९९१२१४१७९९ हे करीत आहेत.