युवक कॉग्रेस सोशल मिडीया प्रमुख सतिश देवकते यांनी वाचवले हरणाचे प्राण ; फुलवळ येथे उपचार करुन वनविभागाकडे केले सुपूर्द

कंधार ; प्रतिनिधी

गऊळ ता.कंधार या गावाशेजारी एक हरीण कुञ्याच्या तावडीत सापडले होते.त्या हरणाची सुरक्षित पणे भोजूची वाडीचे सरपंच तथा युवक कॉग्रेस सोशल मिडीया प्रमुख सतिश देवकते व सोबती हाणमंत गायकवाड यांनी हरणाची सुटका केली. फुलवळ येथिव पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करुन डॉक्टर दिनेश रामपुरे यांनी उपचार केल्यावर वनविभागाकडे सुपूर्द केले.

आज दि.३ जुलै रोजी भोजूची वाडीचे सरपंच तथा युवक कॉग्रेस सोशल मिडीया प्रमुख सतिश देवकते हे भोजूचीवाडी ते कंधार येत असताना वाटेत गऊळ परीसरात एका हरणाचा कुत्र्याने पाठलाग करुन जखमी केले होते.

सदरील हरीण हे मादी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.हरीणीची अवस्था बिकट होती, एकारक्त जात होतं, अनेक ठिकाणी चावा घेतला होता. तितक्यात वाटेतून बांधकाम विभागाची गाडी जात होती त्यांना सहकार्य करण्यास सांगितले आणि त्यातील अधिकारी इंजिनिअर रामेकर , इंजिनिअर प्रशांत जयसिंग पुरे यांच्या गाडीत हरीणीला घेऊन फुलवळ येथील गऊळचे पशुवैद्यकीय अधिकारी येथे उपचारासाठी आणल्या गेले.यावेळी डॉ. दिनेश रामपुरे यांनी त्या जखमी हरणीवार औषधोपचार केला. नंतर वनविभागाचे विठ्ठल गिरे व बारेला यांच्याकडे ती हरिण स्वाधीन करण्यात आली.

भोजूची वाडीचे सरपंच तथा युवक कॉग्रेस सोशल मिडीया प्रमुख सतिश देवकते व सोबती हाणमंत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे हरणाचे प्राण वाचले आहे.त्यामुळे सर्वच स्तरातून या कार्याबद्दल कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *