एक शिक्षण तपस्वी – धोंडीबा गुंटुरे.


बांधाऐ कब बांध सके है.आगे बढने वालो को.
विपदाऐ कब रोक सकी है,पथ पर चलने वालो को,”
साहेब……
साहेब, शब्द उच्चारला की ,कंधार तालुक्यातील एका गुंटुर सारख्या शेतकरी कुटुंबात जन्म झालेला एक सामाजिक ,राजकीय जाण असणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर केवळ एकच व्यक्तीमक्त उभा राहते,ते म्हणजे आमचे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख धोंडीबा गुंटुरे ,आमचे मार्गदर्शक ,’साहेब’ या शब्दासही ज्यांनी एक रुबाब प्राप्त करुन दिला ते आमचे साहेब ,आम्हा सर्वांना “साहेब” या शब्दाचा एक वेगळा अर्थ त्यांच्या आयुष्याने शिकवला.साहेब म्हणजे समता,साहेब म्हणजे संस्कार .साहेब म्हणजे संघर्ष आणि साहेब म्हणजे विश्वाससुध्दा.साहेब म्हणजे मैञीचा धागा.साहेब म्हणजे प्रेरणा ,साहेब म्हणजे चेतना .साहेब म्हणजे संवेदना आणि साहेब म्हणजे साहस .धाडससुध्दा.या शब्दाचे सामर्थ्य कोणत्या शब्दात वर्णावे .संयम आणि धीराचे दुसरे नाव म्हणजे आमचे मिञ तथा मार्गदर्शक साहेब.औदार्य किंवा उदारतेचं मुर्तीमंत स्वरुप म्हणजे साहेब,एका अथांग मानवी समुद्राचे साक्षात दर्शन म्हणजे आमचे मिञ तथा मार्गदर्शक गुंटुरे साहेब..आशा आमच्या साहेबांचा आज नियतवयोमानानुसार सेवानिवृत्ती दिवस..

खरं तर माणूस मनाने कधीच निवृत्त होत नसतो.. ..पण 30जून हा दिवस आम्हांसाठी खरोखरच आनंदोत्सव आहे.कारण कर्तृत्वाचाही उर भरुन यावा असे आमचे मिञ तथा मार्गदर्शक गुंटुरे साहेब आजचा हा दिवस. महाराष्ट्राने ज्या नावाची एक स्वतंत्र ओळख पाहिली .किमान नांदेड जिल्ह्याच्या भाळावरील जे नाव कदापी पुसले जाऊ शकत नाही.त्या ईथल्या ईतिहासाला कधीही विसरता न येऊ शकणाऱ्या आमच्या साहेबांचा हा निरोप सोहळा,.. साहेबांच्या निरोप समारंभानिमित्त काही लिहिण्यासाठी मी पेन हातात घेतो तेव्हा सुरुवातीला मनात एवढं काही भरुन येत की ,यातलं कोणतं लिहू अशी निर्माण होते आणि प्रत्यक्ष लिहू लागलो की ,नेमक्या कोणत्या शब्दात साहेबांचे वर्णन करु.कारण हे व्यक्तीमक्तच शब्दात सामावणारे नाही.ईश्वराने काही लोकांना हेतुपूर्वक पृथ्वीवर पाठवलेले असते की काय कुणास ठाऊक ? त्यांचे कार्य अचाट असते,शब्दात ते तोलले जाऊ शकत नाही,येथे शब्द तोकडे पडतात,आमचे मार्गदर्शक हे असेच एक शब्दापलिकडले व्यक्तीमक्त . इतिहासप्रसिध्द नगरी असणाऱ्या ” गुंटुर या गावी साहेबांचा जन्म झाला…घरात पुर्विचेच राजकीय असल्याने लहानपनासुन सामाजिक संस्कार होत गेले. व्यायाम,खेळ,आणि मदतीसाठी सदैव पुढे असल्याने अगदी महाविद्यालयीन जीवनापासुनच नेतृत्व गुण वाढीस लागले.

नोकरीला लागल्यापासुनच त्यांच्यात कामाची हातोटी होती.. काम करत असताना गरिब.श्रीमंत असा कधीच भेदभाव केला नाही.सर्व मिञांना घेऊन पुढे चालायचे, आमच्या सोबत पुर्ण वेळ मिसळायचे..आडी अडचणी सोडवण्यात नेहमीच अग्रेसर असायचे..तीन मुली व एक मुलगा असा सुखी संसाराचा गाडा गुंटुरे सर व मधुबाला(पत्नी) सोबत सुखाने हाकत ईथ पर्यत आले..सर्वच मुली आतीउच्च शिक्षण घेत आहेत.. आडले नडले आले तरी मदतीचा हात सतत पुढे राहिला आणि भोवतालचे दैन्य. समाजाची ,तालुक्याची दुरावस्था पाहुन अस्वस्थ होणारे साहेब. बहाद्दरपुरा संकुलाचा भार पाठीवर घेऊन कामाला लागले.. कंधार ,उमरीच नाहीत…जिल्ह्यासाठी ,इथल्या माणसासाठी झटण्याचा .झगडण्याचा संघर्ष करण्याचा जो वसा त्यांनी स्विकारला तो अजुनही सोडलेला नाही..

साहेबांना कोणिही भेटो त्याचे समाधान केल्याशिवाय त्याला पाठवत नसत,अनेकांच्या उपयोगी पडले. शाळा ,कालेज.तहसिल.जिल्हा परिषद .शैक्षणिक ,सामाजिक ,कोणतेही बील,मार्गदर्शन ते स्वतः हून मदत करत. .बहाद्दरपुरा संकुलाचा चेहरा मोहरा बदलुन शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करत.आदर्श संकुल बणवले..कोणतेही काम असले की गुंटुरे सरांना विचारा मार्ग निघेल असे प्रत्येक जण म्हणत.. .त्यात कसलाही जाती भेद न मानता साहेबांनी सढळ हातांनी मदत केली. कोणाचाही वाढदिवस असला की साहेब जातीने हजर राहत…स्वकीयच नाही तर विरोधकही साहेबांंमुळे मोठे झाले. साहेबांनी त्यांनाही मदत केली,गरजेच्या वेळी आधार दिला.. आणि स्वतःला मिळालेल्या संधीचं तर सोनच करुन टाकलं.


म्हणतात ना..ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो.जो संधी निर्माण करतो तो बुद्धीवान असतो,आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता असतो.,आणि साहेबांनी तेच करुन दाखवलं . परंतु प्रशासनाने साहेबांची कार्याची दखल घेतली नाही..जिल्हा गुरु गौरव साहैबांना मिळायला हवा होता पण,,….. पुरस्कार हे नाती गोती शिफारशी वर अवलंबून असतात.,चांगले काम करणाऱ्यांना फक्त वापर करुन घेत असतात..तरीही साहेब न डगमगता…काम करत राहिले.. यालाच तर म्हणतात जो जिता वही सिकंदर..
आयुष्याच्या प्रवासात माणसं किती आंतर चालतात या पेक्षा ते कोणत्या दिशेनं चालतात. कश्या प्रकारे चालतात याला खूप किंमत असते.,साहेब नुसते चालत नाहित तर अनेकांना सोबत घेऊन मार्ग दाखवतात.,शिकवत -समजावत चालत राहिले .काही वेळा शञुंची सरशी झाल्यासारखे वाटायचे ,तरीही आयुष्यात प्रगती करताना शञु पुढे गेले तरी चालतील पण आपली माणसे पाठीमागे राहणार नाहीत याची खबरदारी घेत-घेत साहेब प्रवास करत आहेत.

या तालुक्यातील लोकांनीही साहेबांवर विश्वास दाखवला,,,,सतत तेही साहेबांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिले .या विश्वासाला उतराई होण्यासाठी मग साहेबांनीही आजपर्यत प्रयत्न करत आहेत..कष्ट आणि विपत्ती माणसाला खूप काही शिकवणारे श्रेष्ठ गुण आहेत,जे साहासाने यांचा सामना करतात ते जीवन युध्दात विजयी होतात.”असे एका विचारवंताने लिहिले होते.साहेबांचे अजुनही हे सुरु आहे.साहसी वृत्तीने सामना करत राहणे आणि हे साहस …हे धाडस हाच साहेबांचा खरा अलंकार आहे.कुठेतरी वाचलं होतं”मी जीवनाला विचारलंतू एवढा कठीण का आहेस ?त्याने हसत उत्तर दिले,..कारण दुनिया सहज -सोप्या गोष्टींची कदर करत नाही.


मुश्किलो मे भाग जाना आसान होता है.!
हर पहलु जिंदगी का ईम्तीहान होता है..!
डरने वालो को कुच्छ नही मिलता जिंदगीमे !
और लढने वालो के कदमो मे जहा होता है.!


सेवेचं व्रत घेतलेला हा माणुस आहे.त्यामुळे सेवानिवृत्त होण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही.सेवेसाठी प्रवृत्त असणारी माणसे कुठे सेवानिवृत्त होत असतात काय ?ती समाजाची सेवा त्यांच्या हातुन अखंड होत राहो.त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आनंद लाभो ..येणारा भविष्य काळ साहेबांसाठी उज्वलच आहे..””मंजिले उन्हीको मिलती है.जिनके सप्नोमे जान हो…उडान लेने से कुच्छ नही होता बस पंखो मे जान होनी चाहिऐ….!!
साहेबांना…… पुन्हा एकदा बहाद्दरपुरा संकुलाच्या वतीने पुढील आयुष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!
आपलाच एक केंद्रातील सहकारी तथा परिवारातील सदस्य..!!


शेख युसूफ मौलासाब .आंबुलगेकर /कंधार
तथा
विभागिय संघटक ,पुरोगामी परिवार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *