लोहा ; प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील उमरा येथिल शेतकरी
भिमराव चंपती सिरसाट यांनी तहसील कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली.पण आतापर्यंत गुन्हा दाखल किंवा कशल्याच प्रकारची कारवाई झाली नाही , प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तात्काळ लोहा तहसीलदार यांना निलंबित करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा या मागणीसाठी माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
त्यावेळी लोहा तालुका अध्यक्ष संजय जाधव, देगलूर तालुका अध्यक्ष मारुति बसवदे, कंधार तालुका अध्यक्ष अर्जुन कांबळे ,तालुका उपाध्यक्ष शेख अजीज, सचिव मोचीराम वाघमारे, कार्याध्यक्ष बापूराव शेवाळे, सहसचिव बापूराव कल्याणकर ,माजी सैनिक संतोष हिवराळे, नामदेव राठौड आदीची यावेळी उपस्थिती होती.