लोहा घटनेची कंधार तालुक्यासह जिल्हात पुनरावृत्ती नको -कॉग्रेस ओबीसी कंधार तालुका उपाध्यक्ष पपूभाऊ मुसळे यांचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील उमरा येथिल रहीवासी
भिमराव चंपती सिरसाट या शेतकर्याने दि.३ जुलै रोजी आत्महत्या करुन जिवन यात्रा संपवली ही घटना निषेधार्थ असून लोहा घटनेची कंधार तालुक्यासह जिल्हात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कॉग्रेस ओबीसी कंधार तालुका उपाध्यक्ष पपूभाऊ मुसळे यांनी आज रविवार दि,४ जुलै रोजी कंधार येथे आवाहन केले आहे.

कंधार लोहा तालुक्यातील एसबीआय बँक ,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत कुणाचाही वचक राहीला नाही.कंधार लोहा तालुक्यातील सर्व बँका दलालाच्या हातात गेल्या असून गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक या सर्व बँकेच्या दलाला मार्फत केल्या जात आहेत.

तसेच दरम्यान शेतकऱ्यांना वाईट दिवस आले असून राज्याचे मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण लक्ष घालून शेतकऱ्यांना सहकार्य करतील .यासाठी कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखी टोकाची भुमीका घेऊ नये कॉग्रेस चा कार्यक्रर्ता तथा अशोकराव चव्हाण यांचा सच्चा कार्यक्रर्ता म्हणून कंधार येथिल कॉग्रेस कार्यकर्ते अथवा मला कॉग्रेस ओबीसी कंधार तालुका उपाध्यक्ष पपूभाऊ मुसळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *