लोहा : प्रतिनिधी :- शैलेश ढेबंरे
लोहा तालुक्यातील उमरा येथील शेतकरी भिमराव चंपती सिरसाट वय ४३ वर्षे यांनी तहसील कार्यालय लोहा च्या इमारतीमध्ये छतावरून भिमाच्या गजाळीस वायरची दोरी बांधून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ जुलै रोजी दुपारी दोन वाजता लोहा शहरात वाऱ्यासारखी पसरली.
या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस निरीक्षक संतोष तांबे सह पोलीस घटनास्थळी पोहचली घटनास्थळी फाशी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूस डायरी, मोबाईल व पायातील सॅंडल होती. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी त्या डायरी व मोबाईल मधील नंबर घेऊन त्या मयताच्या घरच्यांशी संपर्क साधला व झालेल्या घटनेची माहिती दिली. तो पर्यंत तहसील कार्यालयात शहरातील बघ्यांची तोबा गर्दी झाली होती.
भिमराव चंपती सिरसाट हे मुळ उमरा येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली उमरा येथे त्यांच्या नावे गट.नंबर ६२ मध्ये एक हेक्टर दोन आर जमीन आहे. फाशी घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी गावापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, रजिस्ट्रार ऑफिस तेथे असल्याने फाशी कोणत्या कारणाने घेतली असेल असे अनेक तर्क वितर्कांना शहरात उदान आले आहे. विविध सामाजिक संघटनांनी तहसील कार्यालयात फाशी घेण्याचे कारण द्या यासाठी ठिया मांडून प्रशासन मुडदाबादच्या घोषणा देत फाशी घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रेत खाली घेण्यास विरोध केला.
मयत शेतकऱ्यांला आई,वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा अशा परिवार आहे.