लोहा आत्महत्या प्रकरणी तहसिलदार ,तलाठी,मंडळाधिकारी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -शिवा संघटना लोहा शाखेच्या वतिने निवेदन

लोहा ; प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील उमरा येथिल रहीवासी
भिमराव चंपती सिरसाट या शेतकर्याचा सन 2019-2020 चा खरिपचा पिकविमा मंजुर झाला नाही. शेतकरी सन्मान योजनेचाही लाभ मिळाला नाही.सतत तहसिल व बॅन्केचे उंबरठे झिजवले ,कर्जाच्या ओझ्याच्या डोंगर डोक्यावर चढला आणि याला वैतागुन शेवटी भिमराव शिरसाट यांनी तहसिलच्या तिसर्या माळ्यावर फाशी घेवुन आत्महत्या केली.

वरवर जरी ही नजरेला आत्महत्या दिसत असली तरी ..ही शासकीय यंत्रनेने केलेली हत्याच आहे…याला जबाबदार तहसिलदार ,तलाठी,मंडळाधिकारी या सर्वांवर भांदवि कलम 302 अंतर्गत सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन लोहा पो.स्टे चे पी.आय .श्री तांबे साहेब यांना शिवा संघटना लोहा शाखेच्या वतिने देण्यात आले.


या निवेदनावर शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत लांडगे, ता.उपाध्यक्ष अंकुश सोनवळे, साधु पाटील वडजे ,तालुका संघटक रवी होळगे, शहराध्यक्ष सुर्यकांत आनेराव, व्यापारी आघाडीचे ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे,शिवा वि.आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके , चंद्रकांत बेद्रे, मुकेश भालके,शिवा सोशल मिडीया जिल्हाअध्यक्ष शंकरआप्पा नलबले बेरळीकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *