लोहा-कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या घरी मराठा ओबिसीकरणासाठी संभाजी ब्रिगेड चा ठिय्या

नांदेड ; प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड मराठा ओबीसी करणाचा लढा गेल्या तीस वर्षापासून लढत आहे. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे ,महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर, यांच्या आदेशानुसार आज नांदेड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोहा-कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत .

यामध्ये मराठा समाजाचे ओबीसी करण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण,मा. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नौकरीस पात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात,मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.

या सर्व मागण्यांसह मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलणे आवश्यक आहे.मा. सुप्रीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मराठा समाजातील नोकरीस पात्र 2185 नियुक्त्या रखडलेल्या आहेत. हा तरुणांचा प्रश्न आहे. आपण एक आमदार आहात या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण तरुणांचे प्रश्न सोडवताल ही अपेक्षा आहे. तरी वरील विषय आपण समजून घेऊन. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडावी. लोहा-कंधार चे लोकप्रतिनिधी आहात.

मराठा समाज आपल्याकडून मोठी अपेक्षा घेऊन बसला आहे. आपण विधिमंडळ अधिवेशनात भूमिकामांडावी. जर या वेळी मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळ अधिवेशनात आपण भूमिका मांडली नाही तर संभाजी ब्रिगेड उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेड चे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे , जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे,जिल्हा उपाध्यक्ष सतिश पाटील धुमाळ,प्रदिप गुबरे,माधव घोरबांड, कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे, विकास लुगारे,किरण बाबर, कृष्णा वरपडे, संभाजी गायकवाड, धनंजय कौसल्य, स्वप्निल पाटील, गोविंद जाधव, गोपाळ सालकमोड, श्रीनिवास पवार, विशाल डावरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *