नांदेड/प्रतिनिधी
केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरातील आयटीआय महात्मा फुले चौक येथे दि.3 जुलै रोजी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी देत मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये इंधनाच्या किंमती कमी होत्या आता त्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी येथे व्यक्त केले.
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या वस्तूमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत या भाव वाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या सुचनेवरून नांदेड शहरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना जिल्हाध्यक्ष भोसीकर म्हणाले की, मागील युपीए सरकारच्या काळात गॅस प्रति सिलेंडर 400 रूपये होता आज त्याचे भाव दुप्पट आहे. तसेच पेट्रोल 70 रूपये होते ते आता 107 रूपये प्रति लिटर झाले. डिझेल 50 रू.प्रति लिटर होते ते 87 रू.प्रति लिटर झाले. तसेच इतर खाद्य पदार्थाचे तेल, दाळ व कडधान्याचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या चटक्याने होरपळून निघत आहे. केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरीत मागे घ्यावी, यावर नियंत्रण आणावे असे म्हणत जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.
इंधनाच्या किंमती कमी कराव्यात या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्यां मार्फत प्रधानमंत्री मोदी यांना पाठविण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी दिली व तीव्र भावना मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अॅड.मोहम्मद खॉन पठाण, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, गफार खान, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गोरठेकर, बालाजी शेळके, गजानन पांपटवार, जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूनकर, मनपाचे माजी विरोधीपक्ष नेता जीवन पाटील घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पाटील आलेगावकर, बालासाहेब मादसवाड, प्रा.श्रीपती पवार, अॅड.सचिन जाधव, नागनाथ खेळगे, सुनंदा जोगदंड, रमेश गांजापूरकर, रामदास पाटील जाधव, योगेश पाटील टाकळीकर, देवराव टिपरसे, रेखाताई राहिरे, धनंजय सुर्यवंशी, विठ्ठल पाटील नांदुसेकर, शिवानंद शिप्परकर, अॅड.सचिन देशमुख, आत्माराम कपाटे, सुनिल पतंगे, मधुकरराव पिंपळगावकर, बाळासाहेब भोसीकर, श्रीकांत मांजरमकर, सुभाष गायकवाड, विलास पाटील धुप्पेकर, प्रकाश मांजरमकर, शिवदास धर्मपुरीकर, हणमंतराव किरोळे, लक्ष्मणराव पुलझळके, चंपत हातागळे, मिर्झा एजाज, उध्दवराव पाटील राजेगोरे, बाबुराव हंबर्डे, ज्ञानेश्वर कदम, अनिल सोनसळे, गफार खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.